एथर एनर्जीने रिझ्टा या आपल्या पहिल्या फॅमिली स्कूटरच्या 501 गाड्यांची डिलिव्हरी पुण्यात दिली

Spread the love

पुणे, 29 जुलै, 2024: एथर एनर्जी या भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने आज पुण्यातील ऑर्किड हॉटेल येथे ‘मीट रिझ्टा’ इव्हेंटमध्ये आपल्या 501 एथर रिझ्टा फॅमिली स्कूटर्सची डिलिव्हरी दिली. आजवर एथरने एका दिवसात दिलेली ही सर्वात मोठी डिलिव्हरी आहे. या प्रसंगी समुदाय सदस्य, इलेक्ट्रिक वाहनांचे चाहते आणि नवीन रिझ्टा मालक उपस्थित होते. उपस्थितांना एथरच्या एक्सपिरियंस झोन्सचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. हा एक आकर्षक अनुभव होता आणि त्यांना या ब्रॅंडची प्रगत टेक्नॉलॉजी आणि डिझाईनमागील विचार खोलात जाऊन समजण्याची संधी मिळाली.

या प्रसंगी बोलताना एथर एनर्जीचे चीफ बिझनेस ऑफिसर श्री. रवनीत सिंह फोकेला म्हणाले, “पुण्यात 501 रिझ्टा स्कूटर्सची डिलिव्हरी देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. पुणे ही आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. ती देशातल्या सर्वात मोठ्या दुचाकींच्या बाजारपेठांपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही आमच्या 450 सिरीज द्वारे एक सशक्त समुदाय आमच्या पाठीशी उभा केला आहे. आता आम्ही रिझ्टा सादर करत आहोत, जी आरामदायकता, सुविधा आणि सुरक्षा यांना प्राधान्य देते. कौटुंबिक गरजांसाठी योग्य अशा स्कूटरच्या शोधात असलेल्यांसाठी ही स्कूटर सही आहे. ही स्कूटर अशा लोकांसाठी तयार करण्यात आली आहे, ज्यांना एक व्यवहार्य, विश्वासार्ह आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत स्कूटर हवी आहे, जी दैनंदिन वापरासाठी आदर्श असेल. आम्हाला खात्री आहे की, आगामी महिन्यांत रिझ्टासाठी ग्राहकांची मागणी वाढत राहील.”

समस्त कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रिझ्टामध्ये आरामदायकता, सुविधा आणि सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. रिझ्टाची सीट मोठी आणि आरामदायक असून त्यामध्ये 56L इतकी स्टोरेज स्पेस आहे. ज्यात 34L इतकी जागा सीटच्या खाली आणि 22L फ्रंक अॅक्सेसरीचा पर्याय आहे. रिझ्टामध्ये प्रशस्त फ्लोअरबोर्ड आहे, जो चालकाला पाय ठेवण्याची ऐसपैस जागा प्रदान करतो. शिवाय, रिझ्टामध्ये स्किडकंट्रोल™ सारखी अनेक सुरक्षा फीचर्स आहेत. तसेच, फॉलसेफ™, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल (ESS), थेफ्ट अँड टो डिटेक्ट आणि पिंग माय स्कूटर याही फीचर्सचा समावेश आहे, जी यापूर्वी एथरच्या 450 सिरीजच्या स्कूटर्समध्ये देखील दिलेली होती. रिझ्टा 2 मॉडेल्समध्ये तीन व्हॅरियन्टमध्ये उपलब्ध आहे: रिझ्टा S, 2.9 kWh बॅटरी असलेले रिझ्टा Z आणि 3.7 kWh बॅटरी असलेले टॉप-एंड मॉडेल. 2.9 kWh व्हॅरियन्ट 123 किमी, तर 3.7 kWh व्हॅरियन्ट 159 किमी इतकी आकर्षक रेंज देणे अपेक्षित आहे.

आपल्या चालकांना एक सुरळीत आणि त्रास-मुक्त अनुभव देण्यासाठी एक इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता म्हणून, एथर एनर्जी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर विस्तारित करण्याच्या बाबतीत देखील वचनबद्ध आहे, कारण ते EV एकोसिस्टमचे एक महत्त्वाचे अंग आहे. इलेक्ट्रिक दुचाकींसाठी फास्ट चार्जिंग स्टेशन्सचे त्यांचे  नेटवर्क एथर ग्रिड नावाने ओळखले जाते. ज्यामध्ये देशभरात 1900 फास्ट चार्जिंग पॉईंट्स आहेत. या कंपनीची समस्त देशात सध्या 200 एक्सपिरीयन्स सेंटर्स आहेत. जेथे जाऊन ग्राहक टेस्ट राइड घेऊ शकतात आणि एथर स्कूटर खरेदी करू शकतात. होसूर, तामिळनाडू येथे एथरचे दोन उत्पादन कारखाने आहेत, ज्यापैकी एकात वाहनाची असेंब्ली होते तर दुसऱ्यात बॅटरीचे उत्पादन होते. बिडकिन, AURIC, छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र येथे त्यांचा तिसरा उत्पादन कारखाना सुरू होणार आहे.

2.9 kWh बॅटरीच्या एथर रिझ्टा S ची किंमत 1,10,156/- रु. (एक्स-शोरूम, पुण्यात) असणार आहे. 2.9 kWh आणि 3.7 kWh बॅटरीची एथर रिझ्टा Z अनुक्रमे 1,25,156/- रु. आणि 1,45,157/- (एक्स-शोरूम, पुण्यात) रुपयांत उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *