” पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने“चला वाचूया, पुण्याला नवी ओळख देऊया” हा अभिनव उपक्रम 11 डिसेंबर रोजी…
Category: मनोरंजन
इंडियन आयडॉल 15 दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासोबत साजरा करत आहे त्याच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने एक वर्ष पूर्ण केल्याचा सोहळा!
या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 15 या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये ‘वन…
बालरंगभूमी परिषदेचे ‘बालरंगभूमी संमेलन’२० ते २२ डिसेंबरला पुण्यात होणार
बालरंगभूमी संमेलनात बालकांसाठी विविध कलांची मेजवानी: निलम शिर्के-सामंत पुणे : बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती मुंबई आयोजित ‘बालरंगभूमी…
——-
A Tale Rooted in Culture and Mystery – Experience Rukhwat in Theatres December 13th! Pune :…
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव रुखवत 13 डिसेंबरला चित्रपटगृहात
पुणे : महाराष्ट्र में एक बहुत ही लोकप्रिय और पुरानी परंपरा है रुखवत, जो विशेष रूप…
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव रुखवत 13 डिसेंबर रोजी प्रदर्शित
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव रुखवत 13 डिसेंबरला चित्रपटगृहात पुणे : महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी…
वन्नेस मूवमेंट के संस्थापक मुक्ति गुरु कृष्णाजी का “एक्सपीरियंस एनलाइटनमेंट” कार्यक्रम पुणे में आयोजित
पुणे: संपत्ति और समृद्धि के लिए आवश्यक महत्वपूर्ण बातों की जागरूकता बढ़ाने का कार्य वन्नेस मूवमेंट…
पुणेकरांना भावली ‘तेव्हाची गोष्ट’कविता, गझल आणि रुबायांचे भावत्कोट अभिवाचन
पुणे : उबदार नात्यांच्या शोधात असणाऱ्या, दु:खाकडे पाहण्याची वेगळी नजर लाभलेल्या, जगण्यातले दुर्दैवी वास्तव आणि विचित्र…
महाराष्ट्राची हास्यजत्रा
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यांमध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या कार्यक्रमची नवी पर्वे, त्यांतले नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होत असते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आता कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या पर्वामध्ये आपल्याला नक्कीच नवीन काहीतरी पाहायला मिळणार आहे. तब्बल ६ वर्षांहून जास्त काळ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करतो आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या कार्यक्रमाचे आजवर ८००पेक्षा अधिक भाग प्रसारित झाले आहेत. ह्या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात घर केले असून प्रेक्षकांनीही त्यांच्या या आवडत्या कार्यक्रमाला भरपूर प्रेम दिले आहे. २ डिसेंबरपासून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, कॉमेडीची हॅटट्रीक हे नवे पर्व सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. या पर्वाचे वैशिष्ट्य काय असणार आहे, याबद्दल ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या कार्यक्रमाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले, “प्रेक्षकांनी यापूर्वी प्रहसनांच्या अनेक मालिका पाहिल्या. यांतून अनेक पात्रे लोकप्रिय झाली, पण ती पात्रे फक्त त्या–त्या मालिकेमध्ये पाहिली. या नव्या पर्वामध्ये वेगवेगळ्या मालिकांमधली पात्रे एकमेकांच्या मालिकांमध्ये जाऊन धमाल करताना प्रेक्षकांना पाहायला मिळतील. ह्या पर्वात हा नवा प्रयोग आपल्याला पाहता येईल. यातून नक्कीच मोठा हास्यकल्लोळ निर्माण होईल आणि तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे.” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या कार्यक्रमाचे निर्माते आणि लेखक सचिन मोटे म्हणाले, “यंदाच्या पर्वात प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये काही नवनवीन पात्रे पाहायला मिळतील.” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे लेखक पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत आणि आधीच्या विषयांमध्ये नवीन पात्रांचा आणि गोष्टींचा समावेश करून ते सादर करण्यात येणार आहेत.’महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाचे विशेष प्रोमोज प्रेक्षकांना आवडताहेत. पहिल्याच काही भागांमधला आश्चर्यचकित करणारा पहिलाच भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री पैलवान प्राजक्ता चव्हाण आपल्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये प्रहसन सादर करताना दिसणार आहे. ‘तुजं माजं सपान’ या मालिकेतून दिसलेला तिच्यातला मुळातला रांगडेपणा प्रेक्षकांना भावला होता. तोच अभिनय आता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हास्यवीरांसह रंगलेले तिचे धमाल असे प्रहसन प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. तिचा कोल्हापुरी ठसका आणि कोल्हापुरी ठसकेबाज भाषा आता हास्यजत्राच्या मंचावर पाहायला मिळेल. तर पाहायला विसरू नका, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, कॉमेडीची हॅटट्रीक, २ डिसेंबरपासून सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.
अॅक्शनचा तडका असलेला ‘रानटी’ चित्रपटगृहात
कहाणी जशी सज्जन माणसांची असते तशी ती दुर्जन माणसांची ही असते. काही दुर्देवी घटनांचे वार झेलत…