सामान्य माणसाशी नाळ जोडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा काव्यातून गौरव
कुणाल कामराला पुणेकराचे चोख प्रत्युत्तर! पुण्यात पुन्हा एकदा ठाण्याच्या रिक्षाची जोरदार चर्चा…‘बोलने वाले बोलते रहे, वो…
समान पाणीपुरवठा व कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम मार्गी लावणार
पुणे: “शहराला समान पाणीपुरवठा, कात्रज-कोंढवा रस्त्याचे विस्तारीकरण, बेकायदेशीर बांधकामे आणि प्लॉटिंग, महावितरण कोंढवा कार्यालयाचे विभाजन, उड्डाणपुलास…
डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कारानेहभप डॉ. जयवंत महाराज बोधले, डॉ. प्रकाश खांडगे यांचा होणार गौरव
पुणे : संत विचार प्रबोधिनी, पुणे आयोजित वै. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा रविवार,…
अभिनव सोशल फाऊंडेशनतर्फे सामाजिक भान जपत कष्टकरी तृतीय पंथीयांचा विशेष सन्मानपुणे : आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यता दिवसानिमित्त (ट्रान्सजेंडर व्हिजिबिलीटी) अभिनव सोशल फाउंडेशनतर्फे अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. लोकांपुढे हात पसरून पैसे न मागता स्वकष्टाने आयुष्य जगणाऱ्या तृतीय पंथीयांचा धान्याचे कीट व सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.पारलिंगी लोकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ३१ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यता दिन साजरा करण्यात येतो. जगभरातील पारलिंगी लोकांविषयी जनसामान्यांच्या मनात भेदभावाची भावना असते; ही एक शारीरिक स्थिती असल्याचे समाजभान त्यांच्या मनात रुजलेले नसते. परंतु या पारलिंगी व्यक्तींची समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या दिनाचे आयोजन केले जाते.समाजात दुलर्क्षित असलेल्या या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी अभिनव सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय गायकवाड, उद्योजक अभी होमकर, दीपक सोनटक्के, ॲड. मयुरेश चोंधे, अमोल गायकवाड, सचिन बांदल, अमोल डांगे यांनी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कारणाची संकल्पना साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियुष शहा यांची होती, श्री शनि मारुती मंडळाचे सचिन पवार यांची विशेष उपस्थिती होती. एरंडवणे येथील श्री शनि मारुती मंडळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पुणे महापालिकेत नोकरी करणाऱ्या आराध्या राठोड, जान्हवी काळे, काजल शर्मा, आरुष कुशाळकर, ऋतुजा साळुंके यांचा या वेळी धान्याचे कीट देऊन तसेच मानाचे फेटे बांधून विशेष सन्मान करण्यात आला.या वेळी बोलताना सेजल बल्लोळी म्हणाल्या, आमच्यातीलच काही लोक आम्हाला टोमणे मारतात. आम्ही स्वकष्टाने पोट भरतो म्हणून आम्हाला हिणवतात. परंतु भीक मागून पोट भरण्यापेक्षा कष्टकरून मिळणारा पैसा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. कष्ट करून पोट भरत असल्यामुळेच आमचा येथे सन्मान होत आहे, हे आमच्यासाठी गौरवास्पद आहे.आपण जे आहोत, जसे आहोत त्याचा आनंदाने स्वीकार करत आणि कष्टाने काम करत सन्मानाने जगायचे असते. सन्मानाने काम करणाऱ्यांना सन्मान मिळतो. त्याचप्रमाणे आपल्या पंखाना बळ मिळते, आपल्यात कुठल्याही कमतरता नाहीत याची जाणीव जागृत होते आणि इतरांना आपल्यासारखे सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळू शकते, असे मत पियुष शहा यांनी व्यक्त केले.फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर दीपक सोनटक्के यांनी आभार मानले.फोटो : सत्कारार्थिंसमवेत मंडळाचे पदाधिकारी.
अभिनव सोशल फाऊंडेशनतर्फे सामाजिक भान जपत कष्टकरी तृतीय पंथीयांचा विशेष सन्मानपुणे : आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यता दिवसानिमित्त…
व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची भाजप व्यापारी आघाडीची मागणी
पुणे : शहरातील व्यापाऱ्यांना असामाजिक तत्वे, गुंड, स्थानिक मंडळ व कामगार संघटना यांच्या कडून वेगवेगळ्या प्रसंगी…
‘रुरल आंत्रप्रिन्युअर्स कनेक्ट इनिशिएटिव्ह’ उपक्रमाचा शुभारंभतरुणांनी पुढाकार घेतला तर नोकऱ्यांची निर्मिती शक्य : आनंद देशपांडेकष्ट, कल्पकतेद्वारे ग्रामीण उद्योजकांना यशप्राप्ती : सत्यजित तांबे
पुणे : देशात कामांच्या संधी मुबलक आहेत; परंतु नोकऱ्यांची कमतरता आहे. कोणतेही सरकार सगळ्यांसाठी नोकऱ्या निर्माण…
द फोक आख्यान’ मध्ये परंपरेला आधुनिकतेचा साजश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचा संगीत महोत्सव ; दिवस तिसरा
पुणे : अभंग, गण, गवळण, पोवाडे, पारंपरिक गीते, गोंधळ असे लोककलेचे प्रकार नवनवीन रचना आणि चाली…
श्री रोहित गेरा, व्यवस्थापकीय संचालक, गेरा डेव्हलपमेंट्स यांचा महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या रेडी रेकनर दरांवरील प्रतिपादन
महाराष्ट्र सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी रेडी रेकनर (RR) दरांमध्ये वाढ करून बाजारातील सद्यस्थितीशी मालमत्तेचे मूल्य…
पहिल्या तिमाहीत आँडी इंडियाच्या विक्रीत जबरदस्त वाढ
पुणे : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज २०२५ च्या पहिल्या तिमाहीसाठी त्यांच्या विक्री…
तुळशीबाग राम मंदिरात स्वर मैफलीतून उलगडला रामनामाचा महिमाश्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सवात प्रख्यात गायिका मंजिरी आलेगावकर यांचे सुश्राव्य गायन ; उत्सवाचे २६४ वे वर्ष
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये…