जुलै- सप्टेंबर आर्थिक तिमाहीचे निकाल जाहीर केएसबी लिमिटेडच्या नफ्यात प्रभावी वाढ

Spread the love

पंप उत्पादनातील जगातील एक अग्रगण्य आणि आघाडीची कंपनी म्हणून लौकीक असणाऱ्या केएसबी लिमिटेडचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून त्यानुसार, जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत प्रभावी वाढ दिसून आली आहे. केएसबी लिमिटेड ही कंपनी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट सेवा देण्याला प्राधान्य देते.
• या तिमाहीत 616.5 कोटी रुपयांची विक्री झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यात 9.37 टक्के वाढ झाली आहे .
• 2024 च्या 3 तिमाहींसाठी विक्री मूल्य 1,806.7 कोटी रुपये आहे जे मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत सुमारे 9.86% जास्त आहे.

ठळक वैशिष्ट्ये
• रु. 430 दशलक्ष इतक्या किंमतीच्या सौर पंपांसाठी महत्त्वपूर्ण ऑर्डर मिळवल्या.
• केएसबी व्हॉईस सर्वेक्षणात, कर्मचारी प्रतिबद्धतेसाठी (एम्प्लॉइ एंगेजमेंट) ८८ % इतके गुणांकन प्राप्त झाले आहे. यातून कर्मचाऱ्यांची संस्थेप्रति असणारी बांधिलकी आणि दृढ नाते प्रतिबिंबित होते.
• IFAT प्रदर्शनात व्ही. टी. पंप या नवीन पंपच्या शुभारंभासह उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार.
• फाउंड्रीमध्ये एक नवीन इलेक्ट्रोपोलिशिंग सुविधा स्थापित केली, ज्यामुळे गंज प्रतिकार आणि गुणवत्ता वाढते.
• उत्पादन ट्रॅकिंग अनुकूल करण्यासाठी आणि वेळेवर वितरण सुनिश्चित करण्यासाठी एडव्हान्स प्लॅनिंग आणि शेड्युलिंग टूल लागू करण्यात आले.
• मोबाइल वेअरहाऊस व्यवस्थापन प्रणाली, रिअल-टाइम इन्व्हेंटरी दृश्यमानता, डेटा अचूकता आणि निर्णय घेण्यात सुधारणा यासह डिजिटल परिवर्तन प्रकल्प पूर्ण केले.
व्यवसायाचा संक्षिप्त लेखाजोखा (आकडे कोटी रु. मध्ये)
तपशील Q3 – 2024 Q3 – 2023 Jan’24-Sept’24 Jan’23-Sept’23
(Jul’24-Sept’24) (Jul’23 -Sept’23)
विक्री 616.5 563.7 1,806.7 1,644.6
खर्च 528.9 493.4 1,567.6 1,431.9
चालू नफा 87.6 70.3 239.1 212.7
चालू नफा टक्केवारी (ओपीएम) 14.21% 12.47% 13.23% 12.93%
इतर महसूल 6.6 8.4 31.3 29.8
व्याज 0.6 2.0 2.3 3.7
मूल्यघट 13.7 12.3 39.9 36.0
करपूर्व नफा (पीबीटी) 79.9 64.4 228.2 202.8
करपश्चात नफा (पीएटी) 59.3 48.1 171.0 151.8

जुलै-सप्टेंबर २०२४ या तिमाहीतील कामगिरीविषयी माहिती देताना केएसबी लिमिटेडचे उपाध्यक्ष (सेल्स आणि मार्केटिंग) प्रशांत कुमार म्हणाले, “ऊर्जा क्षेत्रातील प्रभावी आकड्यांसह या तिमाहीची कामगिरी समाधानकारक राहिली आहे.

व्यवसायिक कामगिरीच्या पलीकडे आम्ही साधलेली महत्त्वाची आणि अभिमानाची बाब म्हणजे आमचा कर्मचारी जतन निर्देशांक आहे. यातून आमची कामाप्रति असणारी अत्त्युच्च बांधिलकी, समर्पण, कार्यसंतुष्टता आदीं बाबी प्रतिबिंबित होतात. हा निर्देशांक ८८% असून कंपनीने आता जगातील ४ प्रमुख केएसबी कंपन्यांत स्थान मिळवले आहे. ही बाब के.एस.बी. च्या भविष्यातील वाटचालीसाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी ठरते.
यासह, आम्ही मुंबईत झालेल्या प्रतिष्ठित IFAT एक्सोमध्ये व्ही.टी. पंप सादर करुन आमच्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार केला. येत्या काळात आम्ही उत्कृष्टतेचा पाठपुरावा करून, नाविन्याला चालना देऊन आणि सर्व भागधारकांना शाश्वत परतावा प्रदान करून ही वाढ टिकवून ठेवण्यावर भर देणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

के. एस. बी. लिमिटेड विषयी-
केएसबी लिमिटेड भारतात 1960 साली स्थापन झालेली ही कंपनी के. एस. बी. एस. ई. अँड को. के. जी. ए. ए. चा एक भाग आहे, जी पंप, व्हॉल्वज् आणि सिस्टिम्सच्या जगातील आघाडीच्या पुरवठादारांपैकी एक आहे. बुद्धिमान उपाय प्रदान करण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट सेवा एकत्रित करून, कंपनी भारतीय ग्राहकांच्या असंख्य गरजा पूर्ण करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि मजबूत उपाय देत आहे, मग ते वीज, तेल, बांधकाम सेवा, प्रक्रिया अभियांत्रिकी, जल उपचार, जलवाहतूक इत्यादी असू शकतात. के. एस. बी. च्या अंतर्गत संशोधन केंद्राचे उपक्रम हायड्रॉलिक्स, सीलिंग तंत्रज्ञान, साहित्य, उत्पादन तंत्रज्ञान आणि ऑटोमेशन या क्षेत्रांवर केंद्रित आहेत.
आज के. एस. बी. समूहाची स्वतःच्या विक्री आणि विपणन कंपन्या, उत्पादन सुविधा आणि सेवा कार्यांसह सर्व खंडांमध्ये उपस्थिती आहे. 15, 000 हून अधिक कर्मचारी दोन अब्ज युरोपेक्षा जास्त वार्षिक एकत्रित विक्री महसूल निर्माण करतात.

संपर्क- केएसबी लिमिटेड, मुंबई- पुणे रोड, पिंपरी, पुणे ४११०१८ , दूरध्वनी- ०२० २७१०१०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *