पुणे, दि. 12 डिसेंबर 2024 – गुरू श्री तेगबहादुर यांच्या हौतात्म्याला 349 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून संयोजक गुरू तेगबहादुर फाऊंडेशन यांच्या वतीने 23व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा रेंजहिल्स स्पोर्ट्स मैदान, खडकी येथे 15 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत रंगणार आहे.
पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना गुरू तेगबहादुर फाऊंडेशनचे अध्यक्ष एस. एस. अहलुवालिया आणि लायन रानी अहलूवालीया म्हणाले की, हि स्पर्धा वरिष्ठ, महिला गटात पार पडणार आहे. या स्पर्धेला शहरातील संघाकडून भरघोस प्रतिसाद मिळत असल्यामुळे या स्पर्धेचा स्तर वर्षागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे यावर्षीही शहरातील फुटबॉलपटूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे. यावेळी पीडीएफएचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी, पीडीजी एमजेएफ सीए अभय शास्त्री, लायन्स क्लब ऑफ पुणे कोथरूडचे अध्यक्ष विठ्ठल कुटे, लायन्स क्लब ऑफ पुणे कोथरूडच्या सविता रासोटे आणि गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे सचिव दलजित सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
पीडीएफएचे उपाध्यक्ष प्यारेलाल चौधरी यांनी सांगितले कि, पीडीएफएच्या मान्यतेखाली हि स्पर्धा होत असून गुरू तेगबहादुर फाऊंडेशनचे अध्यक्ष एस. एस. अहलुवालिया आणि लायन रानी अहलूवालीया यांच्या पुढाकाराने अनेक वर्षे या स्पर्धेचे यशस्वीरीत्या आयोजन करण्यात येत असल्यामुळे त्यांनी त्यांचे आभार मानले.
स्पर्धेत एकूण 27 संघानी आपला सहभाग नोंदवला असून यामध्ये ज्युनियर गटात खडकी ब्लू, संघवी एफसी, गतवर्षीचा विजेता संघ दुर्गा एफसी, इन्फंट्स, सिटी एफसी, राहुल एफसी, पुणेरी वॉरियर्स, उत्कर्ष क्रीडा मंच(यूकेएम), गॅलेक्टिक वॉरियर्स, डायनामाइट्स एफसी, साई एफसी, बीटा एफसी, पायोनियर एफसी, नवमहाराष्ट्र, अशोका एफसी, जायंट्स एफसी, रेंजहिल्स मिलान यांसह वरिष्ठ गटात थंडरकॅट्झ, आर्यन्स, जीओजी, इंद्रायणी एफसी, सिटी पोलीस, उत्कर्ष क्रीडा मंच(यूकेएम) अ, उत्कर्ष क्रीडा मंच(यूकेएम) ब, रुपाली एफसी, सिग्मय एफसी आणि ब्लु स्टॅग या संघांचा समावेश आहे. स्पर्धेचे सामने बाद पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत.
या संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेत एकूण 1,50,000/-. रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला आकर्षक रोख पारितोषिकांबरोबर फुटबॉल, बॅग, पदके देण्यात येणार असून सर्व सहभागी संघाच्या खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Photo Caption: From L to R:
Mr.Daljit Singh, Mr.Pyarelal Chaudhary, Savita Rasote, CA Abhay Shastri, Mr.Vitthal Kute, MJF Lion Rani Ahluwalia, Mr.SS Ahluwalia, Mr.Vitthal Kute, Mr.Ejaz Sayyed