पुणे, दि. १८ डिसेंबर: ,”ज्याला पुष्कळ दिले आहे, त्याच्याकडून पुष्कळ गोष्टींची अपेक्षा केली जाते आणि भगवंत त्यांच्यावर बरेच काही कार्य सोपवितो. आपल्याला जे मिळाले आहे ते इतरांना देणे ही आपली जबाबदारी आहे. आपण देवतांचा सन्मान केला तर देवताही आपला सन्मान करेल.” असा आर्शिवाद पद्मविभूषण श्री श्री विश्वेशतीर्थ स्वामीजी यांचे शिष्य श्री पेजावर मठ, उड्डपीचे परमपूज्य श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी दिला.
परमपूज्य श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीला बुधवारी भेट दिली. यावेळी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांनी त्यांचे स्वागत करून आशीर्वाद घेतला.
या प्रसंगी परमपूज्य श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी डॉ. कराड यांनी आयुष्यभर केलेल्या जनसेवेचा आणि आध्यात्मिक कार्याचा गौरव केला. तसेच विश्वरूप देवतेचे मंदिर निर्माण करून महान कार्य केले आहे. आपण एक व्यक्ती नसून शक्ती आहात आणि आपणास भगवंताने समाज कल्याणाची जवाबदारी दिली आहे. एक व्यक्ती जीवनात किती महान कार्य करू शकतो हे आपल्याकडे पाहिल्यावर कळते. आपले कार्य अद्वितीय असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
परमपूज्य श्री विश्वप्रसन्न तीर्थ स्वामीजी यांनी डॉ. विश्वनाथ दा. कराड व डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांचा विशेष सत्कार करून आशिर्वाद दिला.
यावेळी प्रा.स्वाती कराड-चाटे, डॉ. सुचित्र कराड-नागरे, डॉ. संजय उपाध्ये, डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. टी.एन.मोरे, गिरीश दाते, डॉ. महेश चोपडे व डीन, डायरेक्टर, प्राध्यापक व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनसंपर्क विभाग,
एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे