पुणे : कै. अरविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मंगळवारी ‘स्वरगंध’ या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
मैफल मंगळवार, दि. 24 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता एमईएसचे बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी येथे होणार आहे. सुरुवातीस इटावा घराण्यातील आठव्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शाकिर खान यांचे सतार वादन होणार असून त्यांना अमित कवठेकर तबला साथ करणार आहेत. मैफलीच्या उत्तरार्धात पंडित कुमार गंधर्व यांचे नातू आणि मुकुल शिवपुत्र यांचे चिरंजीव भुवनेश कोमकली यांचे गायन होणार असून त्यांना संजय देशपांडे तबला तर सुयोग कुंडलकर संवादिनी साथ करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
फोटो : शाकिर खान, भुवनेश कोमकली
प्रति,
मा. संपादक
कै. अरविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मंगळवारी ‘स्वरगंध’ या सांगीतिक मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
संजय देशपांडे