किरकोळ वादाचा बदला घेण्यासाठी सोसायटीच्या सेक्रेटरीने घेतला काळ्या जादूचा आधार; कोंढव्यातील धक्कादायक प्रकार 

Spread the love

– पिकासो पॅराडाईज सोसायटीतील अग्रवाल कुटुंबीय मानसिक धक्यात  

पुणे : किरकोळ कारणावरून वाद झाल्याने त्याचा बदला घेण्यासाठी सोसायटीचा सेक्रेटरी व त्याच्या मुलाने सोसायटीमध्ये राहणार्‍या एका कुटूंबा वर तंत्रमंत्राच्या सहाय्याने काळी जादू केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा प्रकार घडला असून यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.रुपेश अग्रवाल असे तक्रारदाराचे नाव आहे. तर सोसायटीचा सेक्रेटरी राजकुमार जोशी आणि त्यांचा मुलगा अंकुर जोशी (रा. पिकासो पॅराडाईज अपार्टमेंट, सह्याद्री पार्क, साळुंखे विहार, कोंढवा) यांच्या विरोधात जादूटोणा प्रतिबंध कायदा 3 (2) यांसह भा. दं. सं कलम 294, 500, 504, 506, 34 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंढवा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार रुपेश अग्रवाल आणि सोसायटीचे सेक्रेटरी राजकुमार जोशी आणि त्यांचा मुलगा अंकुर जोशी हे तिघेही पिकासो पॅराडाईज अपार्टमेंट, सह्याद्री पार्क, साळुंखे विहार, कोंढवा या सोसायटीमध्ये राहतात. तक्रारदार रुपेश अग्रवाल व त्यांचे वडील राजेंद्र अग्रवाल 14 मार्च 2024 रोजी सकाळी स्वतःच्या गाडीत ऑफिसला जाण्यासाठी राहत्या घरातून निघाले होते. त्यावेळी सोसायटीचे गेट उघडण्यासाठी वॉचमन हजार नव्हता. त्यावेळी रुपेश अग्रवाल हे सेक्रेटरी राजकुमार जोशी यांच्याकडे वॉचमन गेटवर का नाही? हे विचारण्यासाठी गेले होते. त्यावर वॉचमन माझी गाडी धुण्यासाठी दुसर्‍या सोसायटीमध्ये गेल्याचे त्यांनी सांगितले. यावर सेक्रेटरी राजकुमार जोशी यांना ’वॉचमनला तुम्ही वैयक्तिक कामासाठी का पाठवता’? असे विचारल्याचा राग मनात धरून अंकुर जोशी याने तक्रारदार व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून तुम्हा दोघांना बघुन घेतो अशी धमकी दिली आहे. त्यांच्या विरुध्द खोटा गुन्हा दाखल केला. तसेच तक्रारदार व त्याच्या कुटूंबीयांना मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने अंकुर जोशी याने काळी जादू करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी गेटवर लिंबु ठेवुन व स्वस्तिक वर काळी बाहुली जाळुन जादुटोणा करून अग्रवाल यांच्या कुटुंबियांच्या मनात भिती निर्माण केली. ज्याचे साक्षीदार स्वतः तक्रारदार व त्यांची आई आहे. तसेच तक्रारदारांचे मोठे भाऊ राकेश अग्रवाल व मामा किशनचंद अग्रवाल यांचा व माझे कुटुंबियांचा वेळोवेळी पाठलाग करुन दहशत निर्माण केली आहे. दरम्यानच्या काळात यामुळे तक्रारदारांचे मोठे भाऊ राकेश अग्रवाल यांना या मानसिक त्रासामुळे हृदयविकाराचा झटका देखील आला आहे. या पार्श्वभूमीवर सेक्रेटरी राजकुमार जोशी आणि त्यांचा मुलगा अंकुर जोशी यांच्या विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *