पुणे, दि. १ जानेवारी : विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे लोणी काळभोर येथील विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरूकुल, राजबाग येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, सौ. उषा विश्वनाथ कराड, प्रा.स्वाती कराड चाटे, डॉ. सुचित्रा कराड नागरे, प्रा. सुनीता कराड, डॉ. संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा उपस्थित होते.
३१ डिसेबर रोजी झालेल्य‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ च्या समारोप प्रसंगी मध्यरात्री १२ वा. त्याग व समर्पणाचे प्रतीक असलेल्या यज्ञकुंडामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर, विकार, विकृती व विकल्प सारख्या दुर्गुणांची आहुती देण्यात आली. पुढील २०२५ वर्ष अत्यंत सुखाने, समाधानाने व शांततेने पार पडावे यासाठी प्रार्थना करण्यात आली.
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” नववर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्यातील अवगुणांची आहुती देऊन उद्यापासून शांतीमय जीवन प्रत्येकाने जगावे. भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात श्रेष्ठ संस्कृती आहे. याचे अनुकरण करून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी. तरुणांनी स्वधर्म, स्वाभिमान आणि स्वत्व जागवून खर्या अर्थाने भारतीय अस्मिता जागविण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न करीत आहोत.”
या संगीत महोत्सावात विश्वशांती संगीत कला अकादमीच्या नृत्यशिक्षिका आदिती रिसवाडकर यांनी कथ्थक नृत्य सादर केले. त्यानंतर एमआयटी एडीटीयूच्या विद्यार्थ्यांनी संथाल लोकनृत्य सादर केले. विश्वशांती संगीत कला अकादमीचे विद्यार्थी व प्रा. अंकित गुप्ता यांचा भक्ती संगीत व हिंदी चित्रपटांचे सुवर्णकाळ त्यावर आधारित संगीतमय कार्यक्रम झाला. प्रा. शशांक दिवेकर यांचे सुगम संगीत गायन, वारकरी संप्रदायातील सुप्रसिद्ध गायिका गोदावरीताई मुंडे यांचे गायन झाले. सरतेशेवटी पं. उपेन्द्र भट यांच्या सुमधूर गायनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.
प्रा. स्वाती कराड चाटे यांनी सर्वांना नव वर्षाच्या शुभेच्छा देऊन आभार मानले.
जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी,पुणे