कार्यकर्त्यांनी त्यांच्यातला “कार्य” “कर्ता” जिवंत आणि जागता ठेवावा – संदीप खर्डेकर”.

Spread the love

“ग्लोबल ग्रुप आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने दुर्गम भागातील शाळेत जर्किन भेट”

कार्यकर्त्यांनी त्यांच्यातला “कार्य” “कर्ता” जिवंत आणि जागता ठेवावा असे आवाहन क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केले आहे. आता काळ बदललाय,सध्या अनेक धनाढ्य व्यक्ती विविध माध्यमातून समाजात मदत कार्य करत आहेत, काही इव्हेन्ट च्या माध्यमातून तर काही जण सी एस आर मधून उपक्रम राबवितात असे सांगतानाच संदीप खर्डेकर म्हणाले की ” ही दानशूरता स्वागतार्ह असली तरी यामुळे समाजात काम करणारे कार्यकर्ते निष्क्रिय होण्याचा धोका दिसतोय.
म्हणून कार्यकर्त्यांनी पूर्वीप्रमाणेच गंगाजळीतून पै पै गोळा करूनच समाजकारण सुरु ठेवावे, पंचवीस वर्षांपूर्वी आम्ही अगदी अकरा रुपये ते एकशे एक रुपये गोळा करून गरजूना मदत करायचो, आता कैक पटीने देणारे हात आहेत, पण जुन्या काळातील ही कष्टाने पैसे गोळा करायची सवय मोडू नका, हाच नववर्षाचा संकल्प करा असेही संदीप खर्डेकर म्हणाले.
नववर्षाचे स्वागत करताना भोर जवळील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वाढाणे आणि करंदी गावातील येसाजी कंक विद्यालयातील 80 विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि ग्लोबल ग्रूप च्या वतीने जर्किन भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर,शिक्षण समितीच्या अध्यक्षा माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, कै. विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान चे अध्यक्ष विशाल भेलके,क्रिएटिव्ह फाउंडेशन चे विश्वस्त प्रतीक खर्डेकर, सौ. कल्याणी खर्डेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. खटाटे, उत्साहाने शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक कामात पुढाकार घेणार शिक्षक सोपान शिंदे इ उपस्थित होते.
ह्या शाळेत बहुतांश प्रकल्पग्रस्त नागरिकांची मुलं शिकत असून बहुतांश नागरिक हे मुंबईला कुल्फी विक्रीचा व्यवसाय करतात, तरीही जिद्दीने येथे मुलं शिक्षण घेतात म्हणून आम्ही ह्या शाळेला मदत करण्याचा निर्धार केला असे मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.तसेच विद्यार्थ्यांनी आणि विशेष करून मुलींनी कोणत्याही कारणास्तव अर्ध्यावर शिक्षण सोडू नये, त्यांनी उच्च शिक्षण घेऊन आपली स्वप्न पूर्ण करावीत, त्यासाठी क्रिएटिव्ह फाउंडेशन सर्वतोपरी मदत करेल असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.ह्यापूर्वी शाळेला कपाटांची मदत केली होती आता येणाऱ्या शैक्षणिक वर्षात छत्र्या आणि बुटांची मदत देखील करू असे ग्लोबल ग्रूप चे संचालक संजीव अरोरा व मनोज हिंगोरानी म्हणाले.
सोपान शिंदे सरांनी सूत्रसंचालन केले तर मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक केले.
प्रतीक खर्डेकर व कल्याणी खर्डेकर यांनी संयोजन केले.
विशाल भेलके यांनी आभार प्रदर्शन केले.

आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष,
क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *