Neet परीक्षा स्कॅम’ची न्यायालयीन चौकशीची मागणी..!‘परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेच्या / व्यवस्थेच्या पॅनल प्रमुखा’ कडूनच् निष्पक्ष चौकशी कशी..?काँग्रेस चा संतप्त सवाल

Spread the love


प्रा. प्रदीपकुमार जोशी हे NEET आयोजित करणाऱ्या राष्ट्रीय प्रवेश परीक्षा एजन्सी NTA_Exams चे अध्यक्ष..!
पुणे – NEET प्रवेश परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या प्रमुखाला ‘स्वतःच्याच अखत्यारीतील अनियमिततेच्या आरोपांची चौकशी’ करण्याचे काम दिल्यास तपास निष्पक्ष व न्याय्य कसा असू शकतो (?) असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी विचारला आहे.
‘वैद्यकिय क्षेत्र’ हे नागरी जीवन व आरोग्या विषयी काळजी घेणारे आहे..!
जीवनात महत्वाकांक्षी लक्ष्य प्राप्ती करू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्याना ‘वैद्यकिय, आयुर्वेदीय, दंतकीय, होमिओपॅथी’ पदवी-पदवीत्तोर शिक्षणा करीता केंद्र सरकार तर्फे आयोजित Neet ची प्रवेश पात्रता परीक्षा द्यावी लागते.
मात्र या Neet प्रवेश – पात्रता परीक्षेवर पेपर फुटीचे, हेरा फेरी व स्कॅम’चे गैर प्रकार झाल्याचे समोर आल्यावर, केंद्र सरकारने चौकशी-मागणी मान्य केल्याचे दाखवले. व युपीएससी’चे मोदी काळातील माजी संचालक प्रा प्रदीपकुमार जोशी यांनाच चौकशी साठी नेमल्याचे सांगितले. मात्र प्रा प्रदीपकुमार जोशी हे Neet ची परीक्षा आयोजित करणाऱ्या ‘राष्ट्रीय परीक्षा एजन्सी’ चे NTA चे प्रमुख असल्याने सदर परीक्षा व्यवस्थापन बधणाऱ्या प्रमुखा कडुनच् निष्पक्ष व न्याय्य चौकशी कशी होऊ शकेल..? असा परखड व संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला
सदर प्रकरणी केंद्र सरकार तर्फे सर्वोच्च न्यायालयात जी ऊत्तरे दिली गेलीत त्यात १५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिल्याचे परत घेऊन(?) तेवढ्याच विद्यार्थ्यांची पुन्हा फेर परीक्षा घेण्याचे धक्कादायक व हास्यास्पद विधान देखील केल्याचे समोर आले असून, हरीयाना मधील “एकाच केंद्रात ७ विद्यार्थ्यांना सर्वोच्च समान मार्क्स” मिळाल्याची बाब समोर आली आहे..!
तसेच “काही लाख रू देण्याची तयारी ठेवा व प्रश्न-पत्रीका मिळवा” असे खाजगी कोचिंग क्लासेस चालवणाऱ्यांचे व्हीडीओ देखील पुढे आले असुन,
देशातील विद्यार्थांच्या भवितव्याशी व जनतेच्या जीवाशी खेळणारा हा निंद्य प्रकार असून,
याची मा ऊच्च वा सर्वोच्च न्यायालया तर्फे सुमोटो चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!
काँग्रेसनेते मा राहुलजी गांधी यांनी हा ज्वलंत व विद्यार्थ्यांच्या भवितव्या विषयी आस्थेच्या प्रश्नी सर्वप्रथम आवाज ऊठवल्याचे व हे प्रकरण ऊघडकीस आणल्याचे समाधान देखील काँग्रेसजनांस आहे.. अशी पुस्ती ही त्यांनी जोडली.
—————————————————————///-
मा संपादक ——————- दै वृत्तसंस्था, स न वि वि, कृपया वरील वृत्तांत प्रसिध्दीस देऊन सहकार्य करावे ही विनंती आहे..🙏
आपला
ऊदय लेले (प्रसिध्दी सहाय्यक)
गोपाळदादा तिवारी संपर्क कार्यालय,
अक्षय श्री, २१६ नारायण पेठ, केळकर रस्ता, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *