सुग्रास स्वप्न: अर्चना गौतम आणि राजीव अदातिया यांचे लहानपणीच्या कौशल्याचा उपयोग करून मास्टरशेफ बनण्याचे स्वप्न

Spread the love

या नव्या वर्षी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ- अब उन सबकी सीटी बजेगी!’ या गरमागरम रियालिटी शो साठी तयार व्हा! मास्टरशेफच्या फॉरमॅटमध्ये यावेळी असतील काही तुमच्या लाडक्या सेलिब्रिटीज, ज्या आपले ग्लॅमरस विश्व सोडून अॅप्रन चढवतील आणि शेफची टोपी घालून येतील ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ चा किताब जिंकण्यासाठी. यंदाच्या स्पर्धकांमध्ये इतर सेलिब्रिटीजसोबत रियालिटी टीव्ही स्टार अर्चना गौतम आणि उद्योजक राजीव अदातिया देखील सामील असणार आहेत.
आपल्या वडीलांच्या वारशाचा मान राखण्याचा दृढ निश्चय करून सहभागी होत असलेली अर्चना ‘आपली चमक केवळ रियालिटी शोज पुरती नाही’ हे सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. सेलिब्रिटी मास्टरशेफ मधील सहभागाविषयी ती म्हणते, “माझे वडील, लष्करात कुक होते. त्यांच्यामुळे मला कुकिंगची आवड निर्माण झाली आणि त्यांनी मला चिकाटीचे मूल्य शिकवले. मास्टरशेफ सीझन 1 मध्ये मला प्रवेश न दिल्यामुळे मी खूप खट्टू झाले होते पण आता सेलिब्रिटी मास्टर शेफ या खास सीझनमध्ये सहभागी होताना मला खूप आनंद होत आहे. केवळ मास्टरशेफ हा किताब जिंकणेच नाही, तर माझ्या वडीलांच्या वारशाचा मान ठेवणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि मी हे दाखवून देण्यासाठी येथे आले आहे की, एकदा नकार मिळाला, तर तो शेवट नसतो तर नवी सुरुवात असते.”
मोहक व्यक्तिमत्त्वाचा राजीव अदातिया साचेबंदपणा मोडून आपल्या टिकाकारांना उत्तर देण्यासाठी सरसावला आहे. लंडनमध्ये जन्मलेल्या आणि मोठ्या झालेल्या राजीवने सुरुवातीच्या काळात कठीण परिस्थितीला तोंड देत आपल्या विधवा आईला आधार दिला. या प्रतिकूल परिस्थितीने त्याच्यात खाद्य पदार्थांविषयीचे प्रेम जागे केले आणि चॉकलेट समोसा आणि कॉलीफ्लॉवर पिझ्झा सारख्या नावीन्यपूर्ण पाककृती करण्याची प्रेरणा त्याला मिळाली. राजीवचे हे ठाम मत आहे की, मास्टरशेफमध्ये त्याचा प्रवेश हा काही योगायोग नाही, तर त्याच्या दृढ निर्धाराचे फळ आहे. आपला आनंद व्यक्त करताना तो म्हणाला, “मास्टरशेफने मला निवडले नाही, तर मी ते माझ्यासाठी उपलब्ध करून घेतले. मी या आंतरराष्ट्रीय आणि भारतीय सिरीजचा खूप मोठा चाहता आहे. या किचनमध्ये मी वादळ घेऊन येणार आहे आणि प्रेक्षकांना माझी जगाला माहीत नसलेली बाजू दाखवणार आहे. मी खूप लहान असल्यापासून कुकिंग करत आहे. मला खूप तीव्र अशी फ्लेवर कॉम्बिनेशन्स बनवायला आवडतात, जी चाखणारा त्यांच्या प्रेमात पडतो.”
अर्चनाचा दृढ निर्धार आणि राजीवचे सळसळते व्यक्तिमत्व या सीझनला नक्कीच डायनॅमिक बनवणार आहेत. त्यात तुमचे सगळे आवडते स्टार एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आणि आपला एक नवीन पैलू प्रेक्षकांना दाखवण्यासाठी सज्ज आहेत.

यापैकी कोणता स्टार होस्ट फराह खान आणि सेलिब्रिटी परीक्षक विकास खन्ना आणि रणवीर ब्रार यांना प्रभावित करू शकेल? जाणून घेण्यासाठी बघा सेलिब्रिटी मास्टर शेफ, लवकरच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *