२१ व्या शतकात भारत विश्वगुरू म्हणून उद्यास येईलप्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे विचारःएमआयटी डब्ल्यूपीयूत स्वामी विवेकानंद यांची १६३वीं जयंती साजरी

Spread the love

पुणे, दि. १२ जानेवारी : ” २१ व्या शतकात भारतमाता ज्ञानाचे दालन व विश्वगुरू म्हणन उदयास येईल हे स्वामीजींचे वचन सत्यात उतरत आहे. १८९३ मध्ये स्वामी विवेकानंद यांनी जागतिक धर्म परिषदेत भाकीत केले होते की, विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून जगात सुख, समाधान आणि शांती नांदेल. त्यांनी धर्म, प्रार्थना आणि ध्यान या विषयावर सखोल ज्ञान जगासमोर मांडले. त्यामुळे प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा.” असे विचार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केला.
भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांची १६३ वीं जयंती व युवादिनाचे औचित्य साधून माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटी पुणेेतर्फे विद्यापीठात ज्ञानजागर- भारतीय अस्मिता जागविण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळे प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे बोलत होते.
या प्रसंगी प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. प्रियंकर उपाध्याय, डॉ. महेश थोरवे, डॉ. मिलिंद पात्रे आणि द स्टूडेंट कॉन्सिल ऑफ एमआयटी डब्ल्यूपीयूचे पृथ्वीराज शिंदे उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” बलवान आणि निरोगी शरीरात सशक्त मन नांदते. विद्यार्थ्यांनी एखादी कल्पना स्वीकारली की मग तीला आपले जीवन सर्वस्वी अर्पण करा. सतत तिचाच ध्यास घ्या. तुमच्या शरीराचा अणुरेणु त्याच कल्पनेने भरला जाऊ दया.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,” केवळ जयंती साजरी करून चालणार नाही तर त्या व्यक्ती ने उच्चारण केलेल्या शब्दांना आपल्या आचरणात आणावे. विचारांचा प्रवाह सतत वाहिला पाहिजे. स्वतःतील विवेक जागृत करणे अत्यंत आवश्यक आहे.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,” स्वामी विवेकानंद या शब्दाचे विस्तृतीकरण खूपच सुंदर आहे. विवेक म्हणजे विवेका बरोबर जगणे आणि आनंद म्हणजे स्वतःमध्ये आनंद शोधणे असा अर्थ होतो. जीवनात चारित्र्य हे सर्वात महत्वाचे असून त्याला युवकांनी सांभाळावे. शिक्षणामुळेच मानव्याच्या जीवनात प्रकाश येतो त्यामुळे नैतिक मूल्यांचे आचरण करून जीवन जगावे.”
डॉ. महेश थोरवे म्हणाले,” केवळ ३९ वर्ष जीवन जगलेले स्वामी विवेकानंद यांनी केलेले कार्य अद्वितीय आहे. शक्ती, करूणा आणि चारित्र्य या गोष्टींवर भर देणारे ते सर्व धर्म समावेशक होते. आज त्यांचाच आदर्श घेऊन डॉ. विश्वनाथ कराड आपले जीवन व्यक्तीत करीत आहेत. शिकागोला ज्या ठिकाणी स्वामीजींनी भाषण दिले हेाते त्याच ठिकाणी शेकडों वर्षांनी डॉ. कराड यांनी भाषण देऊन त्यांच्या विचारांना पुर्न जागृत केले.”
या प्रसंगी विद्यार्थी पार्थ भालेराव, आर्या केदार,वेदांग अडसरे, पियुषा पाटील, तिवारी, रुद्र बुराडे, द्विया थोरवे, मुक्ता पाटील आणि ऋग्वेद पंडीत यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील महत्वांच्या पैलूंवर विचार मांडले.
याप्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयूकडून घोषणा करण्यात आली की सव्वा लक्ष विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदाची पुस्तक भेट स्वरूपात देण्यात येईल.
डॉ. मिलिंद पात्रे यांनी स्वागत पर भाषण केले.
आभार डॉ. मिलिंद पांडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *