पुणे : डी. वाय. पाटील पीजीडीएम इन्स्टिट्यूट, द डेटा टेक लॅब व जस्ट 4 आंत्रप्रेन्युअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने नवसंशोधन करणाऱ्या व भावी उद्योजक होऊ पाहणाऱ्या विद्यार्थासाठी एलिफंट टँक, इनोव्हेटेक्स या दोन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रमाचे आयोजन 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी संस्थेच्या आकुर्डी येथील कॅम्पस मध्ये करण्यात आले आहे. याबाबतची माहिती डी वाय पाटील विद्यापीठाच्या पीजीडीएम इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. शलाका पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कल्पेश कुवर आणि ‘द डेटा टेक्स लॅब’ चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित आंद्रे उपस्थित होते.
या उपक्रमाला आतापर्यंत विविध महाविद्यालयातील साडेसातशे पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये अडीचशे पेक्षा अधिक विद्यार्थाना इंटर्नशिप ची संधी देखील मिळणार आहे. तर, उद्योजकतेसंदर्भात 100 पेक्षा अधिक नवकल्पना डी. वाय. पाटील प्रतिष्ठानच्या इनक्युबेशन सेंटरमध्ये स्वीकारल्या गेल्या आहेत. हा केवळ एक इव्हेंट नसून विद्यार्थ्यांना उद्योजकतेसाठी सक्षम करण्याचा चळवळीचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
एलिफंट टॅंक हे उद्योजक विद्यार्थ्यांसाठी अनोखे व्यासपीठ असून तेथे त्यांना त्यांच्या वेगळ्या व्यापारी कल्पना सादर करण्याची स्पर्धा आहे. या सादरीकरणातून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील तज्ञ गुंतवणूकदार आणि मार्गदर्शकासमोर त्यांच्या स्टार्टअप कल्पना सादर करण्याची संधी मिळेल. त्यांचे मूल्यमापन निष्पक्षपणे मानवरहित यंत्रणेद्वारे केले जाईल आणि त्यांना योग्य गुण मिळतील, अशी माहिती आंद्रे यांनी दिली. एलिफंट टॅंक उद्योजकतेवर लक्ष केंद्रित करते, तर 'इनोव्हेटएक्स' हे विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना इंटर्नशिप, प्रोजेक्ट्स आणि करिअर संधी उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
एलिफंट टँकचे मुख्य वैशिष्ट्येः
- इनोव्हेटएक्स हे उद्योग आणि विद्यार्थ्यांना जोडणारे व्यासपीठ
- डेटा टेक लॅब्स ने एक प्रगत ‘एआय’ आधारित प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. ज्यामुळे दस्तऐवज, व्हिडिओ आणि प्रेझेंटेशन स्वरूपात कल्पनांचे मूल्यमापन कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित यंत्रणेदारे होईल.
- प्रत्येक कल्पना व्यवहार्यता, स्केलेबिलिटी (उपयुक्तता) आणि नाविन्य यावर आधारित प्रत्यक्ष मूल्यमापन केले जाते.
- विद्यार्थ्यांना, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून थेट मार्गदर्शन मिळते व निवडलेल्या कल्पनांना मार्गदर्शन, इनक्युबेशन आणि निधी मिळण्याची संधी.
- निवडलेल्या कल्पनांना गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील कंपन्यांसमोर सादर करण्याची संधी.
- इनोव्हेटएक्सद्वारे इंटर्नशिप आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. विविध क्षेत्रातील कंपन्या प्रशिक्षण आणि इंटर्नशिप संधी मिळतात
-थेट प्रकल्प-आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना वास्तविक उद्योगातील समस्या सोडवण्याची संधी मिळेल.
– उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना करिअर कोचिंग, जॉब मार्केट ट्रेंड्स याबद्दल मार्गदर्शन मिळेल
“एलिफंट टैंक विद्यार्थ्यांसाठी केवळ एक स्पर्धा नाही, तर हे त्यांच्यासाठी एक संधी आहे, जी त्यांना उद्योगात मोठे करण्यास मदत करेल”
- तेजस पाटील, ट्रस्टी, डी. वाय. पाटील प्रतिष्ठान
“उद्योग आणि शिक्षण एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे. इनोव्हेटएक्सच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांना उद्योग जगताशी जोडत आहोत.
-रिअर अॅडमिरल अमित विक्रम, कॅम्पस डायरेक्टर, डी. वाय. पाटील आकुर्डी
“आंत्रप्रेन्युअरशिप म्हणजे केवळ व्यवसाय सुरू करणे नव्हे, तर समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करणे आहे. एलिफंट टैंक हा त्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहे
- डॉ. शलाका पारकर, संचालक, डी. वाय. पाटील पीजीडीएम इन्स्टिट्यूट
“आमचे AI-आधारित मूल्यांकन विद्यार्थ्यांच्या कल्पनांना जागतिक मानकांशी जुळवून घेण्यास मदत करते. हे एक नवीन युगातील इनोव्हेशन आहे.
- डॉ. अमित आंद्रे, व्यवस्थापकीय संचालक आणि CEO, द डेटा टेक लॅब्स
अधिक माहितीसाठी www.elephant-tank.com
एलिफंट टँक, इनोव्हेटेक्स द्वारे विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याची संधी
- डी. वाय. पाटील पीजीडीएम इन्स्टिट्यूट व द डेटा टेक्स लॅब यांचा संयुक्त उपक्रम
- विद्यार्थ्यांच्या संकल्पनेला