माईर्स एमआयटी शिक्षण समूह व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे‘मेल टू महात्मा’ विनंती पत्राचा अभिनव उपक्रमविश्वशांतीसाठी सर्व राष्ट्रप्रमुख, युनेस्को व यूनो ला करणार आवाहन

Spread the love

पुणे, ३१ जानेवारी: जागतिक शांतता ही एक सापेक्ष संज्ञा आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षितेला चालना देण्यासाठी विसाव्या शतकात अनेक विचारसरणी उदयास आल्या आहेत. परंतू जागतिक शांततेसाठ गांधीवादी मॉडेल हा एक व्यवहार्य पर्याय आहे. हा मुख्य धागा पकडून माईर्स एमआयटी शिक्षण समूह आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर्फे ‘मेल टू महात्मा’ गांधीजी यांना विनंती पत्राचा अभिनव उपक्रम चालविला जाणार आहे. यामध्ये समूहातील २७ हजार विद्यार्थी व ३ हजार शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी युनायटेड नेशन्स, युनेस्को आणि जगभरातील सर्व प्रमुख देश म्हणजेच अमेरिका, चायना, रशिया, जर्मन, जपान या व्यतिरिक्त अन्य देशातील राष्ट्रप्रमुखांना पत्र लिहिणाच्या संकल्प सोडला आहे.
यामध्ये असे नमूद करण्यात येणार आहे की, म. गांधीजीचे विचार अंमलात आणून, हिंसाचार, रक्तपात, सीमावाद थांबवून शांतता नांदण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी सर्वांना समोर येण्याचे आवाहन माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी व मानवतेचे पुजारी प्रा.डॉ. विश्वनाथ कराड यांनी केले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या ७८ व्या पुण्यतिथी निमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे आयोजित आदरांजली कार्यक्रमात विश्वधर्मी प्रा.डॉ.विश्वनाथ दा कराड यांनी हा संकल्प सोडला आहे.
या वेळी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे, डॉ. संजय उपाध्ये, प्रा. दत्ता दंडगे, डॉ.मिलिंद पात्रे, डॉ. महेश थोरवे आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्टूडेन्ट कॉन्सिलचे अध्यक्ष पृथ्वीराज शिंदे, प्रसाद शिंदे, आर्या दिवान, प्रशांत मानव व शेकडो विद्यार्थी यांच्यासह विद्यार्थी परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले, म. गांधीजींनी सतत आत्मपरीक्षण केले आहे. त्यांचा विचार जीवनात उतरविणे गरजेचे आहे. त्यांच्या तत्वांवर विचार करण्याची वेळ आली आहे. ग्लोबलायझेशनच्या काळात वैज्ञानिक व औद्योगिक प्रगती झाली. त्यातूनच भौतिक सुख, सुविधांची घोडदौड सुरूच आहे. अशा वेळेस अज्ञान, अहंभाव व स्वार्थापोटी अराजकता, आतंकवाद, रक्तपात व अन्य गोष्टींचे थैमानही वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे आपण २१ व्या शतकाचा अंत पाहू शकेल की नाही ही भिती वाटत आहे.
जगप्रसिद्ध संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी ११ व्या शांतता परिषदेच्या निमित्ताने ‘मेल टू महात्मा’ या शीर्षकाखाली लेख लिहिला होता. यातून प्रेरणा घेऊन विश्वशांती दूत महात्मा गांधींच्या ७८ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून, महात्मा गांधीजींना अभिवादन करूण शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी आदरांजली वाहिली.

जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *