पुणे : विद्येची देवता श्री गणेशाच्या जन्मसोहळ्याचे औचित्य साधून श्री शनी मारुती बाल गणेश मंडळाने आज शालेय विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील विज्ञान साहित्य महाप्रसादाच्या रुपात भेट देत सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील प्रयोगशिलता सिद्ध केली. प्रयोगशाळेसाठी दिलेल्या ।साहित्याचा उपयोग करून शिक्षणात प्रगती करू अशी ग्वाही विद्यार्थ्यांनी या प्रसंगी दिली.
कोथरूडमधील पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ शिक्षण प्रसारक मंडळाचे,माध्यमिक विद्यालय, एरंडवणा पौड रोड पुणे 38 ,पद्मविभूषण शरद पवार शैक्षणिक संकुलात गणेश जयंतीनिमित्त विज्ञान साहित्य वाटपाचा उपक्रम श्री शनी मारुती बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष सचिन पवार यांच्या संकल्पनेतून आज (दि. 1) राबविण्यात आला. ढोलताशा पथकाचे अध्यक्ष पराग ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई, साईनाथ गणेश मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा, शाळेचे मुख्याध्यापक वसंत सावंत, राहुल मारणे, दिलीप कदम आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात सचिन पवार म्हणाले, गणेश जयंतीनिमित्त महाप्रसादासाठी पैसा खर्च करीत होतो. पण गेल्या काही वर्षांपासून महाप्रसादासाठी होणारा खर्च सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला. मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेसाठी उपयुक्त असे विज्ञान साहित्य भेट दिले आहे. ज्या शाळेत आपण शिकलो त्याच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
विद्यार्थ्यांना विज्ञान साहित्याचा महाप्रसाद हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल पराग ठाकूर यांनी मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा गौरव केला. ते म्हणाले, विज्ञाननिष्ठ पिढी घडविण्यासाठी या सारखा दुसरा चांगला उपक्रम नाही. गणेश मंडळांच्या अशाच विधायक उपक्रमांमुळे पुण्यातील गणेशोत्सव देशभर गाजतो, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
डॉ. मिलिंद भोई म्हणाले, अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अध्यात्माचा विचार करताना विज्ञानाची दृष्टी पाहिजे आणि विज्ञानाचा विचार करताना आध्यात्मिक बैठक पाहिजे. या दोन्ही गोष्टी गणेश मंडळामुळे साध्य झाल्या आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, विचारांवर आपले यश अवलंबून असते आणि विचार करण्यासाठी प्रयोगशाळा आवश्यक असते. चांगला विचार करा यश नक्की मिळेल.
मुख्याध्यापक वसंत सावंत म्हणाले, प्रयोग शाळेसाठी आवश्यक उपकरणे मिळावीत अशी विनंती शाळेचे माजी विद्यार्थी असलेल्या सचिन पवार यांच्याकडे केल्यानंतर ती मागणी त्यांनी तत्काळ मान्य केली. याचा विद्यार्थ्यांना निश्चित लाभ होणार आहे.
पियूष शहा यांनी श्री शनी मारुती बाल गणेश मंडळाच्या कार्याची माहिती विशद केली.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन झाले. शाळेतील संगीत मंचच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते गणेश शेलार, सुनिल तेलंग प्रवीण पेंढारे,आकाश पाडेकर, अगस्त् मोरे,ज्योती कदम, रुपाली पवार,व शालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.
फोटो ओळ : कोथरूडमधील शनी मारुती बाल गणेश मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रयोग शाळेसाठी आवश्यक विज्ञान साहित्य भेट देण्यात आले. या वेळी उपस्थित पराग ठाकूर, डॉ. मिलिंद भोई, सचिन पवार, पियूश शहा, वसंत सावंत आदी.
प्रति,
मा. संपादक
गणेश जयंतीचे औचित्य साधून कोथरूडमधील शनी मारुती बाल गणेश मंडळाने आज (दि. 1) शालेय विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील विज्ञान साहित्य महाप्रसादाच्या रुपात भेट दिले. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
श्री सचिन पवार, अध्यक्ष, शनी मारुती बाल गणेश मंडळ
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801