पतित पावन संघटनेचे प्रांत सरचिटणीस नितीनजी सोनटक्के यांच्या आदेशाने नियुक्ती पत्र प्रदान
पुणे – पतित पावन संघटनेच्या महाराष्ट्र प्रांत प्रवक्ता पदी अली दारुवाला यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. आज पुण्यातील बोट क्लब येथे पतित पावन संघटनेचे प्रांत सरचिटणीस नितीनजी सोनटक्के यांच्या आदेशाने दारुवाला यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रांत उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे, प्रांत संपर्क प्रमुख राजेश मोटे, पुणे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, पुणे शहर पालक मनोज नायर, पुणे शहर कार्याध्यक्ष गोकुळ शेलार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अली दारुवाला म्हणाले, ” आज समाजात सर्व सामान्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यातून त्यांना न्याय मिळत नसल्याचे नेहमीच निदर्शनात आले आहे. त्यातच मुख्यता लव्ह जिहाद, लँड जिहाद, वोट जिहाद सारखे प्रश्न ऐरणीवर आहेत. यावर संघटनेच्या वतीने जास्त लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. शासनाकडे यासंदर्भात पाठपुरवठा करण्यात येणार आहे. मात्र जर शासनाने याकडे लक्ष नाही दिले तर मग पतित पावन संघटना त्यांच्या स्टाईलने आंदोलन करेल एवढे नक्की”.
पुढे बोलताना दारुवाला म्हणाले, “आज समाजात जातीयवाद मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे त्याला आळा घालणे गरजेचे आहे. देशाचे भविष्य म्हणजेच आपली युवा पिढी व्यसनाच्या आधीन होतं चालली आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेर घर म्हणले जायचे आता हेच पुणे व्यसनाचे माहेर घर बनण्याच्या मार्गांवर आहे हे कुठे तरी थांबले पाहिजे. आज गोहत्येचे प्रमाण वाढले आहे त्यावर आम्ही कठोर ती कारवाई करू. “
नितीनजी सोनटक्के म्हणाले, ” अली दारुवाला यांचे एकंदरीत काम पाहता आजच्या समाजाला अशा माणसांची गरज आहे. आज वर पतित पावन संघटनेत प्रवक्ता हे पद नव्हतेच मात्र दारुवाला यांचे वक्तृत्व कौशल्य पाहून त्यांना हे पद देण्यात आले आहे. दारुवाला नक्कीच या पदाला योग्य ते न्याय देतील हे नक्कीच “.