Housing.com करणार ‘हॅपी न्यू होम्स 2025’ या भारताच्या आघाडीच्या ऑनलाइन प्रॉपर्टी फेस्टच्या आठव्या आवृत्तीची सुरुवात!

Spread the love

या मेगा प्रॉपर्टी इव्हेंटमध्ये 34 शहरांतील श्रेष्ठ डेव्हलपर्स असतील आणि ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान त्याचे जोरदार प्रमोशन करण्यात येईल

नवी दिल्ली, 5 मार्च 2025: भारताची नंबर 1 रियल इस्टेट अॅप Housing.com, आपल्या बहुप्रतीक्षित ऑनलाइन प्रॉपर्टी इव्हेंट ‘हॅपी न्यू होम्स 2025 (HNH’25) च्या आठव्या आवृत्तीचा शुभारंभ करण्यास सज्ज आहे. 10 मार्च पासून सुरू होऊन 10 एप्रिल 2025 पर्यंत महिनाभर चालणारा हा व्हर्च्युअल प्रॉपर्टी फेस्ट आजवरचा सर्वात मोठा फेस्ट असणार आहे आणि देशातील 34 देशांपर्यंत त्याची पोहोच असेल. श्रेष्ठ डेव्हलपर्स, आकर्षक सौदे आणि घर खरेदीचा सुरळीत अनुभव यांच्यासह HNH’25 ऑनलाइन रियल इस्टेट क्षेत्रात नवीन मापदंड स्थापन करण्यास सज्ज आहे.

गेल्या वर्षी सणासुदीच्या मोसमात यशस्वी रित्या साजऱ्या झालेल्या मेगा होम उत्सव 2024 सहित मागच्या आवृत्तींच्या यशानंतर HNH’25 ने डिजिटल रियल इस्टेट क्षेत्रात लक्षणीय क्रांती केली आहे. यातून भारतातील रियल इस्टेट क्षेत्रात प्रॉपटेक इव्हेंट्सचे वाढते प्रमाण दिसून येते. हे इव्हेंट घर शोधणाऱ्या लोकांना 4400 पेक्षा जास्त डेव्हलपर्स आणि चॅनल भागीदारांशी जोडतात आणि महानगरे, टियर-II आणि टियर-III शहरांतील निवासी मालमत्तांचे व्यापक पर्याय प्रदान करतात.
या इव्हेंटच्या यशविषयी खात्री व्यक्त करताना Housing.com चे चीफ रेव्हेन्यू ऑफिसर (CRO) श्री. अमित मसलदान म्हणाले, “लोकांना आकर्षित करून विक्री वाढवण्याच्या बाबतीत ‘हॅपी न्यू होम्स 2025’ एक नवीन मापदंड स्थापन करेल अशी आम्हाला आशा आहे. घर खरेदीच्या क्षेत्रात सतत बदल होत आहेत, आणि आमचा फोकस आजही ग्राहकांना एक बेजोड अनुभव देण्यावर आहे. देशभरातील घर शोधणाऱ्यांसाठीचा पसंतीचा वन-स्टॉप प्लॅटफॉर्म म्हणून आपले स्थान मजबूत करताना आपल्या मालमत्तेचा शोध घेण्याच्या प्रवासात उपभोक्त्यांचा ‘एक विश्वसनीय साथी’ म्हणून पुढे येत असल्याला आम्हाला अभिमान वाटतो.”

श्री. अमित मसलदान पुढे म्हणाले, “HNH’25 च्या माध्यमातून आम्ही घर खरेदी करणाऱ्या आधुनिक ग्राहकांच्या बदलत्या गरजा आणि पसंती पूर्ण करणारी नावीन्यपूर्ण सोल्यूशन्स प्रदान करत आहोत. आमची वचनबद्धता केवळ मालमत्ता दाखवण्यापुरती नसून आम्ही एक व्यापक ईकोसिस्टम तयार करत आहोत, जेथे पारदर्शकता आणि टेक्नॉलॉजी यांचा संयोग असेल आणि ही ईकोसिस्टम प्रत्येक घर खरेदी करू इच्छिणाऱ्यास माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करेल. या वर्षात 34 शहरांत झालेला आमचा लक्षणीय विस्तार देशभरातील वैविध्यपूर्ण रियल इस्टेट क्षेत्रात दर्जेदार हाऊसिंग सहजप्राप्य बनवण्याबाबतची आमची वचनबद्धता दर्शवितो.”

या इव्हेंटमध्ये कॅसाग्रँड बिल्डर प्रायव्हेट लिमिटेड, अवांत ग्रुप, सुमधुर इन्फ्राकॉन प्रा. लि., DSR इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि., DAC डेव्हलपर्स आणि यांसारख्या इतर, या क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्या सहभागी होत आहेत आणि आपल्या प्रीमियम निवासी प्रकल्पांचे प्रदर्शन करणार आहेत.

HND’25 अनेक अत्याधुनिक इनोव्हेशन्स घेऊन येत आहे, ज्यांच्यामुळे घर खरेदी करण्याचा अनुभव अधिक चांगला होईल. यंदाच्या इव्हेंटमधील एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे व्यावसायिकटेणे सादर केलेल्या प्रोजेक्ट व्हिडिओजची सुरुवात. या व्हिडिओजमध्ये निष्णात अँकर्स सखोल माहिती प्रदान करतील, आकर्षक आणि माहितीपूर्ण सैर घडवून या मालमत्ता जिवंत करतील. त्या व्यतिरिक्त, या मंचावर सामील प्रत्येक कंपनीचे तपशील कसून तपासलेले असतील, ज्यामुळे घर खरेदी करणाऱ्याला खात्रीशीर पारदर्शकता आणि विश्वासार्हता मिळेल. हा इव्हेंट अधिक आकर्षक करण्यासाठी, HNH’25 दरम्यान Housing.com मार्फत गृह कर्ज घेणाऱ्या उपभोक्त्यांना खात्रीने कॅशबॅक मिळेल. ज्यामुळे त्यांच्या घर खरेदीच्या प्रवासात मूल्यवर्धन होईल.

HNH’25 आपली उपस्थिती 34 शहरांपर्यंत विस्तारित करत आहे आणि देशभरातील घर खरेदी करणाऱ्यांसाठी निवासी मालमत्तांच्या निवडीचे व्यापक विकल्प प्रदान करत आहे. यावर्षी गुवाहाटी, रायपुर, पटणा, कोची, सूरत, डेहराडून आणि वाराणसी ही नवीन मार्केट या इव्हेंटमध्ये दाखल झाली आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीनुसार खरेदी करण्यासाठी घरांचे खूप पर्याय उपलब्ध होतील.

व्हिजिबिलिटी आणि सहभाग जास्तत जास्त वाढवण्यासाठी Housing.com ने विविध चॅनल्सच्या माध्यमातून एक व्यापक मार्केटिंग अभियान करण्याचे योजले आहे. या इव्हेंटला ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान मोठे कव्हरेज देण्यात येईल, ज्याला आघाडीच्या डिजिटल मंचांवरून प्रमोशनद्वारे समर्थन मिळेल. या अभियानाच्या रणनीतीमध्ये व्हिडिओ पोस्ट्ससह आकर्षक सोशल मीडिया कंटेंट सामील करणे, OTT प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटल मीडियावर दमदार उपस्थितीद्वारे समर्थन देणे समाविष्ट आहे.

अलीकडे ऑनलाइन प्रॉपर्टी फेस्ट्स रियल इस्टेट क्षेत्राला नवीन आकार देत असताना Housing.com ने डिजिटल इनोव्हेशनमध्ये आपले आघाडीचे स्थान कायम राखले आहे. अँन्ड्रॉईडवरील 4.5 आणि iOS वरील 4.6 अॅप रेटिंगमधून या प्लॅटफॉर्मचा उत्कृष्टतेचा ध्यास प्रतिबिंबित होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *