पुणे : कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर (750) सुवर्णमहोत्सवी जन्मवर्षानिमित्त डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानतर्फे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा जीवनपट उलगडून दाखविणाऱ्या ‘नमो ज्ञानेश्वरा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम शनिवार, दि. 22 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे निरूपण संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे करणार आहेत. कार्यक्रमाचे संहिता लेखन डॉ. पूजा देखणे यांचे असून त्या कथानकाद्वारे माऊलींची महती विशद करणार आहेत. शेर शिवराय, पावनखिंड, फते शिकस्त या चित्रपटांचे संगीत व पार्श्वगायन करणारे सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी तसेच सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमातून पुढे आलेल्या प्रियांका ढेरंगे-चौधरी अभंग सादर करणार आहेत. केदार दिवेकर यांचे पार्श्वसंगीत असून अभय नलगे, राजेंद्र बघे, चैतन्य पवार, प्रसाद भांडवलकर साथसंगत करणार आहेत.
निराशेच्या गर्तेत अडकलेल्या आणि दिशाहिन झालेल्या युवा पिढीला मार्गदर्शन मिळेल असे तत्त्वज्ञान माऊलींनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून जगासमोर आणले. त्यांचे हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत, मुख्यत्वे करून युवा पिढीने त्याचे आकलन करून घेऊन ती विचारसरणी अंगीकारावी आणि आपल्यासह इतरांचेही कल्याण करावे, हा शुद्ध सामाजिक हेतू मनात ठेवून ‘नमो ज्ञानेश्वरा’ या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे, असे डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितले. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
फोटो : डॉ. भावार्थ देखणे, डॉ. पूजा देखणे, अवधूत गांधी
प्रति,
मा. संपादक
कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर (750) सुवर्णमहोत्सवी जन्मवर्षानिमित्त डॉ. रामचंद्र देखणे साहित्य-कला प्रतिष्ठानतर्फे शनिवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा जीवनपट उलगडून दाखविणाऱ्या ‘नमो ज्ञानेश्वरा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
डॉ. भावार्थ देखणे
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801