स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडियाचापुणे प्रकल्पातून ५ लाख इंजिन उत्पादनाचा टप्पा पार

Spread the love

पुणे : मेक इन इंडियाअंतर्गत स्कोडा आँटो वोक्सवॅगन इंडिया कंपनीने पुण्यातील चाकण प्रकल्पातून अंदाजे ५ लाख इंजिन उत्पादनाचा टप्पा पार केला आहे. यामुळे देशातील तसेच जागतिक बाजारपेठांना पाँवरट्रेन सोल्यूशनचा पुरवठा अधिक जलदगतीने होण्यास मदत होणार आहे.

या महत्त्वाच्या टप्प्याविषयी बोलताना स्कोडा आँटोच्या उत्पादन आणि लाँजिस्टिकचे संचालक सदस्य अँड्रियास डिक म्हणाले की, पुण्याच्या चाकण प्रकल्पातून ५ लाख इंजिन उत्पादन कंपनीने केले आहे. यामुळे यामुळे आमच्या जागतिक उत्पादन नेटवर्कमध्ये भारताची भूमिका अधिक मजबूत झाली आहे. टेक्नॉलॉजी आणि कार्यबल विकास यामध्ये आम्ही केलेल्या गुंतवणुकीमुळे आमची उत्पादन क्षमता वाढत आहे. परिणामी दर्जेदार आणि किफायतशिर पॉवरट्रेन्सचे उत्पादन होत आहे. भारतातील प्रगत उत्पादन ईकोसिस्टम आणि कुशल कार्यबल यांची दर्जेदार आणि कार्यक्षम पॉवरट्रेन सोल्यूशन्स द्वारे जागतिक मागणी पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका आहे.

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO पियुष अरोरा म्हणाले, “पॉवरट्रेन उत्पादनात स्थानिक पातळीवर मिळालेले हे यश उल्लेखनीय आहे. यामुळे इनोव्हेशन प्रती असलेली आमची वचनबद्धता अधोरेखित झाली आहे. 2014 पासून आम्ही एक मजबूत पाया घातला आहे आणि त्याच्या जोरावर आम्ही बाजारपेठेच्या गरजा जागतिक दर्जाच्या इंजिन्सद्वारे पूर्ण करत आहोत. आमच्या मेड-इन-इंडिया इंजिन्समध्ये असलेल्या उच्च स्तराच्या लोकलाईझेशनमधून भारतीय ऑटोमोटिव्ह उत्पादन आणि पुरवठा ईकोसिस्टम मजबूत करण्यासाठी या ग्रुपचे स्थानिक स्रोतांचा वापर करण्याचे धोरण आणि योगदान दिसून येते. आमच्या क्षमता वाढवण्यासाठी आणि जागतिक-दर्जाच्या ऑटोमोटिव्ह उत्पादनासाठीचे केंद्र म्हणून भारताचे स्थान मजबूत करण्यासाठी गुंतवणूक करण्याचे आम्ही चालू ठेवणार आहोत.”

स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया प्रगत पॉवरट्रेन टेक्नॉलॉजीसह पर्यावरणीय जबाबदारीवरील लक्ष कायम ठेवले आहे. या समुहाच्या 1.0-लीटर TSI इंजिनमध्ये प्रगत एक्झॉस्ट एमिशन टेक्नॉलॉजी आहे, तर 1.5-लीटर TSI इंजिनमध्ये अॅक्टिव्ह सिलिंडर टेक्नॉलॉजी (ACT) आहे. अशाप्रकारे स्वच्छ गतीशीलतेविषयीची त्यांची वचनबद्धता दृढ आहे.

दरम्यान, स्कोडा ऑटो फॉक्सवॅगन इंडिया 2014 पासून आपल्या चाकण सुविधेत इंजिनांचे उत्पादन करत आहे. जागतिक गुणवत्ता मानके, उत्सर्जनाच्या कडक नियमांचे पालन आणि सुधारित इंधन क्षमतेबरोबरच लोकलाईझेशनवर त्यांचा विशेष भर असतो.आपली कार्यक्षमता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी कंपनीने प्रगत उत्पादनात गुंतवणूक करण्याचे चालू ठेवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *