आंतरराष्ट्रीय योग दिवस 2024 साजरा करण्यासाठी पुण्यातली राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था सज्ज

Spread the love

पुणे, : पुण्यातली राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था  (एनआयएन)21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करणार आहे. हा 10 वा  योग दिन असल्याने हा महत्वाचा टप्पा आहे. या वर्षीची संकल्पना ,”स्वतःसाठी आणि समाजासाठी योग” ही आहे. योग दिनाचा उद्देश शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर योगाचा सखोल प्रभाव अधोरेखित करणे हे आहे.

योगाचे फायदे केवळ व्यक्तीपुरते मर्यादित नाहीत तर  योग, समुदाय आणि सामूहिक कल्याणाची भावना प्रोत्साहित करण्याबरोबरच , समूह सत्रे आणि सामुदायिक योग याद्वारे सामाजिक संबंध वाढवतो. शिवाय योग हा सर्वसमावेशक असल्याने  तो सर्व वयोगटातील लोकांसाठी शक्य आहे.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था ही नैसर्गिक आणि सर्वांगीण आरोग्य पद्धतींना चालना देणारी एक अग्रणी संस्था आहे. संस्थेने अनेक दशकांपासून सर्वांगीण आरोग्यासाठी आणि शाश्वत जीवनासाठी योगास प्रोत्साहन देणारे परिणामकारक कार्यक्रम सातत्याने आयोजित केले आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  या संस्थेने योगाचे महत्त्व लोकांना सांगण्यासाठी आणि शिक्षित करण्यासाठी योग प्रोटोकॉल  प्रात्यक्षिके आयोजित केली आहेत. दैनंदिन जीवनात योग तंत्र आणि त्यांचे उपयोग दर्शविणारी थेट योग प्रात्यक्षिके म्हणजेच सामान्य योग प्रोटोकॉल जे कोणीही सहजपणे करू  शकेल अशा पद्धतीने आखण्यात आले आहे. ही  प्रात्यक्षिके खालील ठिकाणी आयोजित केली जातील.

1. “बापू भवन’, मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता, पुणे – 411001

2. निसर्ग ग्राम, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी, पुणे- 411048

3. निसर्ग साधना केंद्र, आंबेगाव, गोहे बुद्रुक., पुणे- 410509

याशिवाय केंद्रीय संचार ब्युरो, प्रादेशिक पारपत्र कार्यालय, मध्य रेल्वे, पुणे दिवाणी न्यायालय आणि पुण्याच्या आसपासच्या अनेक शाळा आणि महाविद्यालयांशी ही संस्था निगडीत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिन  2024 चा संदेश देण्यासाठी , प्रा. डॉ. के. सत्य लक्ष्मी, संचालक , नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, 20 जून 2024 रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे (आय.आय.टी मुंबई ) या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात एक सत्र घेणार आहेत.

प्रा. डॉ. के. सत्य लक्ष्मी, संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, यांनी सांगितले की “योग हे सर्वांगीण आरोग्य आणि कल्याण वाढवण्यासाठी एक प्रभावी साधन आहे. एनआयएनमध्ये, आम्ही योग आणि निसर्गोपचाराच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी वचनबद्ध आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *