- वात्सल्यम असोसिएट्स एलएलपी चा ब्रँड, त्यांचे पहिले रेस्टॉरंट बालेवाडी हाय स्ट्रीट #2 येथे सुरु
- २७०० स्के फू. मध्ये पसरलेले. सात्त्विक तत्त्वांनी शिजवलेले स्वादिष्ट शाकाहारी पदार्थ उपलब्ध
पुण्यात प्रथमच दक्षिण भारतातील पाचही राज्यांमधून सात्त्विक पाककलेने परिपूर्ण असे ‘पंचसत्त्व’ या रेस्टॉरंटचे उदघाटन श्रीमती मालती आणि श्रीमान वेदांता चारी यांच्या हस्ते ४ जुलै २०४ रोजी करण्यात आले. २७०० स्के फू. मध्ये पसरलेले, पंचसत्त्व हे दक्षिणेकडील पाच राज्यांमधून तयार केलेले उत्कृष्ट शाकाहारी पाककृती प्रस्तुत करते, जे अस्सल, नैसर्गिक घटक वापरून पौष्टिक जेवणाचा अनुभव देण्यासाठी सात्त्विक तत्त्वांसह तयार केले जाते. आपण अनेक अद्वितीय दक्षिण भारतीय पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो जे त्यांच्या चव, शैली, आणि पोत यांच्या बाबतीत प्रथम आहेत.
रेस्टॉरंटच्या शुभारंभप्रसंगी बोलताना, सह-संस्थापक डी व्ही वामन म्हणाले: “आम्ही या उद्योगात आमचा ध्यास जोपासण्यासाठी उतरलो आहोत. आणि भारतातून एक जागतिक ब्रँड तयार करण्याचा आमचा मानस आहे. आमचा ठाम विश्वास आहे की आम्ही जगाला शाकाहारी दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ पुरवू शकतो जे उत्कृष्ट आणि पौष्टिक आहे म्हणून आम्ही आमचा ब्रँड पंचसत्त्व घेऊन आलो आहोत. ब्रँडचे नाव दुहेरी संकल्पनेने प्रेरित आहे: पंच- ज्याचा संस्कृतमध्ये अर्थ एक विशाल, ज्वलंत प्रसार तसेच पाच असा होतो. पंचमहाभूतांच्या संकल्पनेसह त्याचे आध्यात्मिक महत्त्वही खूप आहे. पंचाची ही कल्पना दक्षिणेकडील पाचही राज्यांतून ही येते आणि दुसरी संकल्पना म्हणजे सत्त्व – ज्याची संस्कृतमध्ये प्रकाश, चांगुलपणा आणि शुद्धता अशी उत्तम व्याख्या केली जाते.
ते पुढे म्हणाले “पंच-सत्त्वासह, आमचे ध्येय आहे की एक कॅज्युअल डायनिंग साउथ इंडियन व्हेजिटेरियन रेस्टॉरंट ब्रँडची एक प्रतिष्ठित साखळी तयार करणे ज्यामध्ये सातत्यपूर्ण दर्जाचे अस्सल, अनोखे आणि स्वादिष्ट पाककृती उपलब्ध असेल आणि ग्राहकांना एक संस्मरणीय, प्रीमियम जेवणाचा अनुभव देता येईल.
यावेळी बोलताना पद्मासानी रंगनाथ, संस्थापक म्हणाल्या, : “पंचसत्त्व हे दोन टोकांचे सुवर्ण माध्यम आहे, जेथे प्राचीन विज्ञानाच्या पद्धती दक्षिण भारतातील पाककलेच्या आनंदासह समकालीन संस्कृतींना भेटतात, हे दक्षिण भारताच्या समृद्ध संस्कृती, इतिहास आणि खाद्यपदार्थांचे एक प्रतीक आहे. आम्ही तुमच्या ताटात तिच्या भौगोलिक आणि संस्कृतीप्रमाणे वैविध्यपूर्ण चवींचे मिश्रण आणत आहोत; सात्त्विक तत्त्वांसह शिजवलेले जे तुमचे मन, शरीर आणि आत्मा तृप्त करेल. पंचसत्त्व मध्ये, आम्ही पौष्टिक अन्नाची आवड, परोपकारी सेवेचे तत्त्वज्ञान, ग्राहक केंद्रिततेचे मुख्य मूल्य, स्वच्छता आणि गुणवत्तेवर सतत लक्ष केंद्रित करतो. पंचसत्त्व हे तुमच्यासाठी दक्षिणेतील अदभूत स्वादांचे पदार्थ चाखण्याचे ठिकाण आहे.”
डी. व्ही. केशव, सह-संस्थापक पुढे म्हणाले: “आमची आवड, उद्दिष्ट आणि प्रस्ताव ब्रँडच्या व्हिज्युअल आयडेंटिटी डिझाइनद्वारे योग्यरित्या मांडली गेली आहेत – प्रतिक, टाइपफेस, रंग आणि टॅगलाइनद्वारे अस्तित्वात आणली गेली आहे. या ब्रँडच्या कॅज्युअल डायनिंग रेस्टॉरंट फॉरमॅटसह, त्याचे आरामदायक वातावरण, कुशल सेवा आणि घरगुती आतिथ्य, उच्च-गुणवत्ता, स्वच्छता आणि स्वादिष्ट अन्नासाठी बेंचमार्क सेट करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.
वात्सल्यम असोसिएट्स एलएलपी बद्दल थोडेसे:
वात्सल्यम असोसिएट्स एलएलपी २०२१ मध्ये स्थापन करण्यात आलेला एक नवीन उपक्रम आहे, ज्याद्वारे आरोग्यदायी आणि चविष्ट पाककृती देणारी रेस्टॉरंटचे विविध स्वरूप आणि ब्रँडची स्थापना करण्याचा उद्देश आहे. ही कंपनी पुण्यातील डी व्ही वामन आणि डी व्ही केशव या दोन तरुण अभियंता भावांची संकल्पना आहे, ज्यांनी त्यांची अन्न उद्योगातील सेवेचा ध्यास पूर्ण करण्यासाठी आणि जागतिक ब्रँड तयार करण्यासाठी स्थापन केली होती. त्यांना त्यांची आई, पद्मासानी रंगनाथ ज्या एक विज्ञान पदवीधर असून आणि संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवीधर, कर्म-भक्ती-ज्ञान वेदांताचा सराव.करत असलेल्या यांचा पाठींबा आहे.
पंचसत्त्व हा वात्सल्यम असोसिएट्स एलएलपी चा दुसरा ब्रँड आहे, एक कॅज्युअल ऑल-डे डायनिंग दक्षिण भारतीय शाकाहारी रेस्टॉरंट. त्यांचा पहिला ब्रँड पाव मंत्र, २०२१ मध्ये हैदराबादमध्ये लॉन्च करण्यात आला होता.