‘राज्याची – सत्ता’ शहेनशहांच्या दावणीला बांधलेल्यांकडून महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण कसे होणार..? – काँग्रेसचा संतप्त सवाल

Spread the love


“महाराष्ट्राच्या मानबिन्दू वर घावा घालणाऱ्या निंद्य – घटनेची व कला संचालनालयाच्या मान्यतेची” न्यायालयीन चौकशी करा..
पुणे –
दस्तुरखुद्द पंतप्रधानांच्या हस्ते (८ महीन्या पुर्वी) अनावरण झालेल्या, राजकोट गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, ही घटना महाराष्ट्राच्या अस्मितेवरील घाव घालणारी अत्यंत शरमेची व निंदनीय घटना असुन, शिव छत्रपतीं बद्दल टोकाची अनास्था व असुया व्यक्त करणारी घटना असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
“शिव छत्रपतींचे चेहऱ्यावर त्यांचे वरील घातकी हल्याचा वण दाखवणे”, हे देखील शिव छत्रपतीं विषयी टोकाची अनास्था व हेटाळणी करण्याजोगेच असल्याचा सनसनाटी आरोप ही त्यांनी केला. राजकोट येथील ८ महीन्यांपुर्वी पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण झालेल्या पुतळ्यास महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने दिलेल्या मान्यतेची सखोल न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी देखील काँग्रेस ने केली. तसेच ‘राज्याची – सत्ता’ शहेनशहांच्या दावणीला बांधलेल्या त्रिकुट सरकार कडून महाराष्ट्राच्या अस्मितेचे रक्षण कसे होणार..? असा संतप्त सवाल ही काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात विचारला..!
भाजप’च्या कर्नाटक मुख्यमंत्र्यांकडून वा महाराष्ट्राच्या राज्यपालांकडून वा भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदीं कडुन महाराष्ट्राच्या अस्मितांचा वारंवार अवमान करण्याचे निंदनीय प्रयत्न होत असल्याची बाब सतत पुढे येत आहे हे कशाचे द्योतक (?) असल्याचा सवाल ही काँग्रेस ने केला. काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी पुढे म्हणाले की,
अरबी समुद्रात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणे कोट्यावधींची जाहीरात बाजी करून केवळ जगाला दर्शवायला “पुतळ्याची पाया भरणी समारंभ पंतप्रधानांनी केला मात्र ८ वर्षात शिव छत्रपतींच्या स्मारकाची पुर्तता जाणीव पुर्वक न करणे” हे महाराजांप्रती कोणत्या आत्मियतेचे वा आदराचे वा कर्तव्याचे प्रतिक आहे..(?) असा सवाल ही त्यांनी केला.
—————————————————
ऊदय लेले
प्रसिध्दी सहाय्यक – गोपाळदादा तिवारी संपर्क कार्यालय, अक्षय, २१६ नारायण पेठ, केळकर रस्ता, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *