एमआयटीत डब्ल्यूपीयूत विकसीत भारत अभियान अंतर्गत युवा कनेक्ट कार्यक्रम
पुणे, २५ सप्टेंबर ः ” शिक्षण, आरोग्य, कौशल्य, क्रीडा आणि युवा या घटकांच्या माध्यमातूनच आपला देश विकसित भारत बनणार आहे. ज्या दिवशी भारत ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल त्यावेळेस महाराष्ट्र सुध्दा १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल. पुढील तीन वर्षात भारत तिसरी आर्थिक महासत्ता बनेल. असा विश्वास केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांनी व्यक्त केला.
भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने आयोजित विकसीत भारत अभियान अंतर्गत युवा कनेक्ट कार्यक्रम कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयू च्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयू चे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ. आर. एम.चिटणीस व कुलसचिव प्रा. गणेश पोकळे उपस्थित होते.
यावेळी राहुल विश्वनाथ कराड यांनी अनुराग ठाकुर यांचा विशेष सत्कार केला.
अनुराग ठाकुर म्हणाले,”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुसार २०४७ मध्ये भारतातील युवक संपूर्ण जगावर राज्य करेल. विकसीत भारत एक नारा नाही तर संकल्प आहे. विकसीत भारतासाठी युवकांचे योगदान महत्वाचे आहे. भविष्यातील भारतासाठी केंद्र सरकारने १०० दिवसांमध्ये १५ लाख कोटी पेक्षा अधिक प्रकल्पांना मंजूर दिली आहे.”
“देशात स्टार्टअप कार्यक्रमला सर्वाधिक प्रोत्साहन देण्यात आले आहे. देशातील शेतकर्यांनी आत्महत्या करू नये व त्यांना रोजगार मिळावा म्हणून स्वामीनाथन कमिटी स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी पीएम किसान सन्मान योजना आहे. चंद्रयान ने देशात क्रांती घडविली. विकसित भारतासाठी इन्फ्रास्ट्रक्चर सर्वाेत्तम हवे. त्यासाठी यावर्षी ११ लाख कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. देशात रोज ९१ किमी रस्ते बनविले जात आहेत. ७० वर्षात जेवढे एअरपोर्ट बनविण्यात आले नाही, त्यापेक्षा अधिक एअरपोर्ट बनविण्यात आले आहेत. “
सरकार १ कोटी युवकांना देशातील ५०० टॉप कंपन्यामध्ये इंटर्नशिप देणार आहे. पब्लिक पेपर लिंक होऊ नये म्हणून नवा कडक कायदा, मेडिकल कॉलेज मधील सिटांची संख्या वाढविणे, ४ कोटी १० लाख युवकांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण, महिला सबलीकरणावर भर, टुरिझम वर कार्य, महिलांना लखपती बनविण्याचे कार्य, ४ कोटी घरे बनविणे, १४ कोटी महिलांना गॅस कनेक्शन, ५३ कोटी लोकांचे बँक अकांउन्ट उघडणे, प्रत्येक घराघरात वीज . तसेच देशात स्टार्टअप कार्यक्रमला सर्वाधिक प्रोत्साहन देण्यात आले.”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले, ” या देशात सर्वात मोठी युवा शक्ती आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी भारत विकासासाठी युवा शक्तीला जोडणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी एमआयटी डब्ल्यूपीयू तर्फे युवकांसाठी भारतीय छात्र संसद, सोशल लिडरशीप डेव्हल्पमेंट प्रोग्राम व राईड यासारखे अनेक कार्यक्रमाचे आयोजन प्रतिवर्षी करण्यात येते. ”
प्रा. डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले.
बॉक्स
विकसीत महाराष्ट्र
केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, विकसीत महाराष्ट्र बनविण्यासाठी अटल सेतूची निर्मिती, रोजगार आणि युवकांना अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. भारत जेव्हा ५ ट्रिलियन अर्थ व्यवस्था बनेल तेव्हा महाराष्ट्र १ ट्रिलियन अर्थ व्यवस्था म्हणून उद्यास येईल.”