पुण्यात नव्याने बांधण्यात आलेल्या मेट्रो मार्गावर सुलभ कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणारी एअरटेल ही पहिली सेवा पुरवठादार कंपनी ठरली आहे

Spread the love


कसबा पेठ ते स्वारगेट या संपूर्ण मार्गावर, दिवाणी न्यायालय आणि शिवाजीनगर येथील स्थानकांसह, प्रवाशां ना अखंड (सुलभ) कनेक्टिव्हिटी लाभणार आहे

पुणे, : भारती एअरटेल (“एअरटेल”) ही भारतातील अग्रगण्य दूरसंचार सेवा पुरवठादारांपैकी एक आहे आणि तिने घोषणा केली आहे की, तिच्या प्रवाशांना पुणे मेट्रोच्या नव्याने उद्घाटन केलेल्या उत्तर-दक्षिण मार्गावर (कॉरिडॉरवर) अखंड आणि सुलभ कनेक्टिव्हिटीचा आनंद उचलता येणार आहे. यामुळे पी.सी.एम.सी ते स्वारगेट या संपूर्ण मार्गावर कनेक्टिव्हिटी देणारी एअरटेल ही पहिली ऑपरेटर (कंपनी) ठरली आहे. या मार्गावर शिवाजी नगर, जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट ही नव्या स्थानके सामील आहेत.एअरटेलने 17.4 किमी मार्गावरील लक्षणीय साइट्स अपग्रेड केलेल्या आहेत जेणेकरून 5जी क्षमता वाढविता येईल. याशिवाय, कंपनीने 6 किमी भूमिगत मेट्रो मार्गात सातत्यपूर्ण कव्हरेजसाठी मेट्रो स्थानकांमध्ये समर्पित इन-बिल्डिंग सोल्यूशन्स तैनात केले आहेत. यामुळे प्रवाशांना 5जी स्पीडचा, अखंड व्हॉईस कॉल्सचा आणि डेटा ट्रान्समिशनचा आनंद उचलता येणार असून प्रवास करत असताना त्यांना कनेक्टेड राहता येईल आणि उपयुक्त गोष्टी करता येतील.”पुण्यातील आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम देऊ करण्याची बांधिलकी आम्ही स्वीकारलेली आहे. एअरटेलने नवीन मेट्रो मार्गावर अतिरिक्त नोड्स व साइट्स तैनात केलेल्या आहेत. प्रवाशांना यामुळे प्रवास करताना हाय स्पीड मोबाइल इंटरनेटचा उपयोग करता येणार आहे. आमच्या नेटवर्कवर विसंबून राहता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी गरजेच्या गोष्टी आम्ही करणार आहोत आणि हे आमच्या सर्व ग्राहकांसाठी एक अत्यावश्यक साथीदार बनणार आहे”, असे भारती एअरटेलचे महाराष्ट्र आणि गोवा चे सी.ई.ओ जॉर्ज मॅथेन यांनी सांगितले.”या नव्या टप्प्यामुळे पुणे मेट्रोचा मार्ग आता एकूण 33 किलोमीटरचा होणार असून त्यात 30 हून अधिक स्थानके असतील. एअरटेल ही एकमेव ऑपरेटर (कंपनी) आहे जिने शहरातील संपूर्ण मेट्रो मार्गावरील कनेक्टिव्हिटी सुनिश्चित केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *