समुत्कर्षची कोथरुड मधील रंगकर्मींना दिवाळी भेट!

Spread the love

५० टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध

आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते कार्ड वाटप

महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेने कोथरुड मधील रंगकर्मींना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विशेष भेट दिली असून, ५० टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी कोथरुडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या कार्डचे वाटप करण्यात आले.

दिवाळीला आता काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची गडबड सुरू आहे. मात्र, रंगभूमीची मनोभावे सेवा करणाऱ्या नाट्यकला जिवंत ठेवणाऱ्या, पण वयामुळे घरीच असलेल्या आणि लोकांच्या दृष्टीने काहीशा विस्मृतीत गेलेल्या ज्येष्ठ नाट्य कलावंतांनाही दिवाळीचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी कोथरुड मधील समुत्कर्ष ग्राहक पेठेने विशेष पुढाकार घेतला आहे.

या अंतर्गत कोथरुड मधील ज्येष्ठ रंगकर्मींना ५० टक्के सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून देण्याचा ग्राहक पेठेने निर्णय घेतला आहे. त्यामुळे रंगकर्मींना मोठा आधार मिळाला आहे. मंगळवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या कार्डचे वाटप करुन धान्य उपलब्ध करून देण्यात आले.

यावेळी भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, ऑल आर्टिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर, सचिव गणेश मोरे, उपसचिव सौ अश्विनी कुरपे, उप खजिनदार मनोज माझिरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सोमनाथ फाटके
संचालक मोनिका जोशी समुत्कर्ष फाऊंडेशनच्या वनिता काळे, शशिकला मेंगडे, धनंजय रसाळ, पार्थ मठकरी यांच्या सह ज्येष्ठ रंगकर्मी, बॅक स्टेज आर्टिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *