पुणे, : लोकसेवकांच्या भ्रष्टाचारविषयक तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सादर करता याव्यात याकरिता तालुक्यातील विविध ठिकाणी सकाळी ११ ते सायंकाळी ५ दरम्यान विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिली आहे.
पंचायत समिती कार्यालय सभागृह आणि आठवडा बाजार परिसर, पौड येथे मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी, चाकण पोलीस स्टेशन सभागृह, आठवडा बाजार परिसर आणि शासकीय कार्यालय, बसस्थानक चाकण येथे बुधवार २३ ऑक्टोबर रोजी, जेजुरी इंडस्ट्रियल मॅन्यूफॅक्चर्स असोशिएनचे सभागृह, आठवडा बाजार परिसर आणि बसस्थानक जेजुरी येथे गुरुवार २४ ऑक्टोबर रोजी, पोलीस स्टेशन सभागृह, आठवडा बाजार परिसर आणि बसस्थानक, आळेफाटा येथे शुक्रवार २५ ऑक्टोबर रोजी, शासकीय विश्रामगृह आणि आठवडा बाजार परिसर, नारायणगाव येथे शनिवार २६ ऑक्टोबर रोजी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शासकीय विश्रामगृह आणि आठवडा बाजार परिसर, जुन्नर, शासकीय विश्रामगृह, आठवडा बाजार परिसर, बसस्थानक, शिक्रापूर, आठवडा बाजार परिसर, लोणीकंद, शासकीय विश्रामगृह, आठवडा बाजार परिसर, भिगवण आणि उरळी कांचन येथील शासकीय कार्यालय आणि आठवडा बाजार परिसर या ठिकाणी रविवार २७ ऑक्टोबर रोजी विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वेळापत्रकानुसार उपस्थित राहून नागरिक त्यांच्याकडील माहिती, तक्रारी सादर करू शकतात, असे लाचलुचपत विभागाच्या पुणे परिक्षेत्राचे सहायक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी कळविले आहे.
0000