खराडीत मोबाईल चोरी करणा-या टोळीचा खराडी पोलीसांनी केला पर्दाफाश करण्यात खराडी पोलिस स्टेशन पुणे शहर यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२१/१०/२०२४ रोजी फिर्यादी, वय २० वर्षे, रा. कात्रज, पुणे यांनी तक्रार दिली की, दिनांक १८/१०/२०२४ रोजी सांयकाळी ०७/०० वा ते रात्री १०/०० वा पर्यत न्यु इंग्लिश फिनेक्स स्कुलच्या समोरील मैदानात, खराडी पुणे येथे इव्हेंट (शो) असल्याने त्या ठिकाणी ते सदरचा शो पाहण्याकरीता गेले होते तसेच सदरचा इव्हेंट (शो) पाहण्याकरीता मोठया प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी जमली होती त्यादरम्यान अज्ञात चोरटयांनी गर्दीचा फायदा घेवुन फिर्यादीच्या खिश्यातील मोबाईल फोन व सदर इव्हेंट (शो) करीता जमलेल्या प्रेक्षकांचे देखील मोबाईल फोन अज्ञात चोरट्यांनी चोरलेले असल्याने चंदननगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.५४१/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास खराडी पोस्टे कडील तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे व अंमलदार हे दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपींचा व चोरीस गेले मोबाईल फोनचा शोध घेत असताना, शेखर शिंदे, अमोल जाधव व श्रीकांत कोद्रे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली की, वर नमुद गुन्हयातील संशयीत आरोपी हे स्वीट इंडीया चौक, खराडी, पुणे येथे असलेबाबत माहिती मिळाल्याने तपास पथकाचे अधिकारी पोउपनि/राहुल कोळपे व पोलीस हवा. महेश नानेकर, पो. अमंलदार सचिन पाटील, प्रफुल्ल मोरे, अमोल जाधव, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव असे सदर ठिकाणी गेले असता तेथे संशयीत आरोपी नामे १) अखिल व्यंकटरमना गोदावरी वय २४ वर्ष रा. फलकनामा, रंगारेड्डी जिल्हा हैद्राबाद २) सय्यद महमद इद्रीस शेख वय २१ वर्ष रा. मिलनसार सोसा, १२ बिल्डींग जवळ, एस. आर. ऐ, पॅरेमान खार रोड, मुंबई ३) लोकेश हनुमत पुजारी वय ३१ वर्ष रा. घोरपडी गाव, बी. टी. कवडे रोड, शिवदत्त कॉलनी, पुणे ४) पप्पु भागीरथी वैश्य वय ३४ वर्ष रा. शांतीलाल कम्पांउट, जवाहरनगर, खार ईस्ट, मुंबई हे मिळुन आल्याने त्यांना खराडी पोलीस ठाणे येथे आणुन त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांचेकडून विविध कंपन्याचे २,३०,०००/-रुपये किंमतीचे एकुण १४ मोबाईल फोन हस्तगत करुन इव्हेंन्टमध्ये व गर्दीचे ठिकाणी मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा खराडी पोलीसांनी पर्दाफाश करुन त्यांना अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय चव्हाण, तपास पथक प्रभारी अधिकारी पोउपनि राहुल कोळपे, पोलीस अंमलदार महेश नाणेकर, सचिन पाटील, प्रफुल मोरे, अमोल जाधव, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव यांनी केली आहे.