वडगावशेरी मतदारसंघात दहा जणांनी अर्ज भरले;सुनिल टिंगरे ,बापूसाहेब पठारे यांचा समावेश

Spread the love

येरवडा : येरवडा : वडगावशेरी मतदार संघात जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारांनी निवडणूक अधिकार्यांजकडे अर्ज सादर केले. एकूण दहा जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
वसुबारसचा मुहूर्त साधून येरवडा येथील वडगावशेरी मतदारसंघाचे निवडणूक कार्यालयात सोमवारी 9 उमेदवारांनी निवडणूक निर्णायक अधिकार्यारकडे उमेदवारी अर्ज दिला. यामध्ये महायुतीकडून राष्ट्रवादी पक्षाचे सुनील टिंगरे यांनी भरला आहे. तर महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे यांनी 24 ऑक्टोबरलाच उमेदवारी अर्ज दाखल केला होता; परंतु वसुबारसचा मुहूर्त साधून शक्ती प्रदर्शन करून काही कागदपत्रे सादर केली. तसेच बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे.
अर्ज सादर करण्यापूर्वी महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांनी फेरी काढून शक्ती प्रदर्शन केले. पठारे यांनी खराडी ते येरवडा पर्यंत महानिर्धार फेरी काढली. तर टिंगरेे यांनी धानोरी गावातून विश्रांतवाडी, नागपूर चाळमार्गे येरवडा क्षेत्रीय कार्यालयापर्यंत शक्ती प्रदर्शन केले. सुनील टिंगरे यांनी तीन अर्ज भरले आहेत. एक महायुतीकडून राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट, तर दोन अपक्ष अर्ज दाखल केले आहे. बापूसाहेब पठारे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दोन अर्ज भरले आहेत, तर राजेश मुकेश इंद्रेकर, विनोद कुमार ओझा, सुनील नारायण अंधारे, सुनील बबन खांदवे (मास्तर), हारून करीम मुलाणी, शईबाझ हुसैन अब्दुल कय्युम चौधरी, मधुकर मारूती गायकवाड यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. दहा जणांकडून सोमावरपर्यंत 14 अर्ज दाखल झालेले आहे.
सुनील टिंगरे यांचा अर्ज दाखल करताना दीपक मानकर, पांडुरंग खेसे, सतिश म्हस्के, चंद्रकांत टिंगरे, अजय सावंत,नारायण गलांडे, शिवसेनेचे सुनील जाधव, तसेच संदीप जर्हा्ड, सुनिता गलांडे, मीनल सरोदे आदी उपस्थित होते.
तर बापूसाहेब पठारे यांच्या शक्ती प्रदर्शनादरम्यान शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, आनंद गोयल, नितीन भुजबळ, सागर माळकर, राष्ट्रवादीचे प्रकाश म्हस्के, भीमराव गलांडे, शैलेश राजगुरू, महेंद्र पठारे, किशोर विटकर, काँग्रेसचे सुनील मलके, रिपब्किलन पक्षाचे सचिन खरात, राजेंद्र खांदवे, राजेंद्र शिरसाट, राहुल शिरसाट, अमित म्हस्के, राजू ठोंबरे, रमेश सकट, सचिन भगत, भैय्यासाहेब जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *