भारतामध्ये लंबग्रोन डायमंड ज्वेलरीची वाढती मागणी लक्षात घेऊन या वेगाने वाढणाऱ्या ब्रँडने डिसेंबरपर्यंत १३ नवीन स्टोअर्स उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
पुणे, १५ नोव्हेंबर २०२४ – भारतातील सर्वांत मोठ्या लॅबग्रोन डायमंड अॅड, लाईमलाईट डायमंड्सने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत पुण्यात आपले पहिले स्टोअर सुरू केले आहे. या नव्या स्टोअरचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापट यांच्या हस्ते झाले. को-फाऊंडर श्री. निरव भट्ट आणि रिजनल पार्टनर श्री. अतुल बोरा यांच्यासोबत प्रिया बापट यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला चारचाँद लागले,
५०० चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रात पसरलेले हे स्टोअर लाईमलाईट डायमंड्ससाठी आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे, कारण त्यांनी १५ स्टोअर्सचा टप्पा ओलांडून भारतभर आपला ठसा पसरवला आहे. मागील दोन वर्षांत ब्रेडची झपाट्याने वाढ झाली असून, मुंबई, कोलकाता, दिल्ली, जयपूर, वाराणसी, हैदराबाद, राजकोट, बंगळुरू, चेन्नई यांसारख्या ३५ पेक्षा अधिक शहरांमध्ये यांची उपस्थिती आहे. लाईमलाईट डायमंड्सने स्वतःला सोलिटेअर ज्वेलरीसाठी एक अंतिम गंतव्य म्हणून स्थापित केले आहे, ज्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक सौंदर्य यांचा उत्कृष्ट मिलाप आहे.
ब्रेडच्या संग्रहाचे कौतुक करताना प्रिया बापट म्हणाल्या, “लंबग्रोन डायमंडची संकल्पना आणि स्टोअर पाहून मी खूप प्रभावित झाले आहे, हे भारतात बनवलेले डायमंड आहेत आणि मला वाटते की प्रत्येक भारतीय महिलेला हे डायमंड घालण्यात अभिमान वाटेल, त्यांचे सोलिटेअर संग्रह अत्यंत दर्जेदार असून आधुनिक डिझाईनसह तयार केले आहे. हे खरोखरच एक मोठे आणि अधिक आकर्षक अपग्रेड आहे. पुण्यात हे अनोखे डायमंड्स आणल्याबद्दल मी लाईमलाईट टीमचे अभिनंदन करते.”
स्टोअरचे रिटेल डिझाईन ब्रेडच्या मोहक, आधुनिकता, टिकाऊपणा आणि आलिशानपणाच्या संकल्पनेचे उत्तम प्रतीक आहे. या स्टोअरमध्ये ग्राहकांना अत्याधुनिक आणि किफायतशीर डिझाईन कस्टमायझेशन, लाइफटाईम बायबैंक, १००% एक्सचेंज गॅरंटी अशा सेवांचा लाभ घेता येईल,
लाईमलाईट डायमंड्सच्या फाउंडर व मॅनेजिंग डायरेक्टर पूजा शेठ माधवन म्हणाल्या, “आमच्या ब्रेडला मिळालेल्या उत्कृष्ट प्रतिसादाबद्दल पुण्यात नवीन स्टोअर सुरू करण्याचा मला अभिमान आहे. पुण्याला चमक आवडते, परंतु येथे आमच्या दागिन्यांच्या उच्च गुणवत्तेबद्दलही खूप कौतुक होत आहे. शिवाय, किफायतशीर किंमतींमुळे ग्राहकांना आमचे उत्पादन अधिक आवडते.”
लंवग्रोन डायमंड्स उद्योगाविषयी बोलताना त्यांनी पुढे म्हटले, “भारतामध्ये लॅबग्रोन डायमंड्स उद्योगाला दरवर्षी १५-२०% बाद मिळत आहे. ग्राहकांमध्ये लंबग्रोन डायमंड्सबद्दल जागरूकता खूप वाढली आहे आणि बऱ्याच ग्राहकांना लंबडायमंड हे खरे असल्याचे समजले आहे.”
लाईमलाईटचे प्रादेशिक भागीदार श्री, अतुल बोरा यांनी सांगितले, “लाईमलाईट डायमंड्ससोबतच्या विन्तारित भागीदारीबद्दल आम्ही खूप आनंदित आहोत. आम्ही पुण्यातील ग्राहकांसाठी सर्वोत्तम लॅबग्रोन डायमंड्सची डिझाईन सादर करण्यास उत्सुक आहोत.”
नवीन लाईमलाईट डायमंड्स स्टोअरला भेट द्या आणि हित्यांच्या जगातील जादूचा अनुभव घ्या. अधिक माहितीसाठी www.limelightdiamonds.com वर भेट द्या.