क्रिएटिव्ह फाउंडेशन व नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने गुरुनानक जयंती व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त स्वमग्न मुलांच्या केंद्रास विविध उपयोगी वस्तू भेट.
स्वमग्न मुलांच्या समस्या खूप वेगळ्या असून त्यांचा दिनक्रम बघितल्यावर आणि त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल ऐकून त्यांच्या वेदनांची कल्पना येते असे संदीप खर्डेकर म्हणाले.अश्या मुलांसाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ही संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि नवलराय ए हिंगोरानी चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने आज गुरुनानक देव यांच्या 555 व्या जयंती आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त प्रसन्न ऑटिझम सेंटर येथील मुलांसाठी विविध उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,प्रसन्न ऑटिझम सेंटर च्या कार्यकारी संचालिका साधना गोडबोले, संचालक सुभाष केसकर व स्वमग्न विद्यार्थी उपस्थित होते.
केंद्र सरकारने दिव्यांग जनांच्या यादीत स्वमग्न मुलांचा समावेश केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार च्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना साधनाताई गोडबोले यांनी ” राज्य सरकार ने अश्या मुलांसाठी थेरपी सेंटर उभरावेत ” अशी अपेक्षा व्यक्त केली.
पुणे मनपा तर्फे देखील अश्या मुलांच्या संगोपन व उपचारासाठी केंद्र उभारावेत यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.
भावी काळात ही ह्या मुलांना सर्वतोपरी मदत करण्याचे वचन नवलराय ए हिंगोरानी ट्रस्ट चे विश्वस्त मनोज हिंगोरानी आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर यांनी दिले.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष,
क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995