पुणे, ५ डिसेंबर २०२४ – डॉएच बँक आणि अक्षय पात्र फाउंडेशनने पुण्यातील शिवाजीनगर येथे विद्यार्थ्यांना पोषक आहार पुरवित आरोग्य, शिक्षण व आर्थिक वाढीला हातभार लावण्यासाठी अद्ययावत किचनचे भूमीजन केले. या नाविन्यपूर्ण केंद्राच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम म्हणजे प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण (PM POSHAN) योजनेच्या माध्यमातून समाजाच्या वंचित गटातील मुलांच्या आयुष्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठीच्या या संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांच्या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अक्षय पात्र फाउंडेशन ही संस्था पीएम पोषण उपक्रमाच्या अंमलबजावणीतील भागीदार व एनजीओद्वारे चालविला जाणारा जगातील सर्वात मोठा शालेय भोजन उपक्रम आहे.
२०२६ च्या सुरुवातीस कार्यान्वित होणार असलेले हे बहुमजली किचन संपूर्ण पुण्यातील सरकारी आणि सरकारी अनुदानप्राप्त शाळांतील २५,००० विद्यार्थ्यांना दररोज गरम, पौष्टिक भोजन पुरविणार आहे. समाजाच्या दुर्लक्षित स्तरातील मुलांची शाळेतील उपस्थिती, त्यांची शैक्षणिक कामगिरी आणि एकूण आरोग्य व स्वास्थ्यामध्ये सुधारणा घडवून आणणे हे या उपक्रमाचे लक्ष्य आहे. या केंद्रामध्ये स्वच्छता आणि सुरक्षेचा उच्चतम दर्जा राखला जाईल व ते अक्षय पात्रचे पुण्यातील मध्यवर्ती किचन म्हणून कार्यरत राहील. पोषण व शिक्षणाच्या समस्येवर उपाय शोधण्यापलीकडे जात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी व स्थानिक शेतीला पाठबळ पुरवित समाजाच्या आर्थिक विकासाला खतपाणी घालण्यासाठीही हा प्रकल्प सज्ज आहे.
या कार्यक्रमा प्रसंगी डॉएच बँक ग्रुप, इंडियाचे सीईओ श्री. कौशिक शापारिया यांच्यासह अक्षय पात्र फाउंडेशनच्या पुण्याचे रिजनल प्रेसिडंट श्री. संपती दास, अक्षय पात्र फाउंडेशनचे सीईओ श्री. श्रीधर व्यंकट,श्री.प्रवीण एनआर (आयएफएस),श्री.पृथ्वीराज बीपी(आयएएस) व पुणे सरकारी विभागाचे तसेच अक्षय पात्र फाउंडेशन इतर वरीष्ठ प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना डॉएच बँक ग्रुप, इंडियाचे सीईओ श्री. कौशिक शापारिया म्हणाले, “डॉएच बँकेमध्ये आम्ही असे मानतो की, समाजावर चिरस्थायी असा प्रभाव निर्माण करण्यामध्ये सहयोगाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. भूक आणि शिक्षणाचा प्रश्न सोडविण्याप्रती, विद्यार्थ्यांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी सक्षम बनविण्याप्रती आमची दृढ बांधिलकी पुण्याच्या या नव्या किचनमध्ये प्रतिबिंबित झाली आहे. पुण्यात आमचे पाय भक्कमपणे रोवलेले असल्याने आमच्या कर्मचाऱ्यांनाही या अर्थपूर्ण कार्याला पुढे नेण्याच्या व शाश्वत बदलांची जोपासना करण्याच्या कामात सहभागी करून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
अक्षय पात्र फाउंडेशनचे सीईओ श्री. श्रीधर वेंकट म्हणाले, “आजचा भूमीपूजनाचा सोहळा म्हणजे वर्गखोल्यांतील भूकेचे निवारण करण्यासाठी आणि संपूर्ण पुण्यातील मुलांसाठी शैक्षणिक संधी निर्माण करण्यासाठी डॉएच बँकेच्या साथीने सुरू असलेल्या आमच्या प्रवासातील एक लक्षणीय टप्पा आहे. या ‘स्टेट-ऑफ आर्ट’ किचनच्या माध्यमातून आम्ही आमच्या कार्यान्वयन क्षमता लक्षणीयरित्या वाढविण्यास सज्ज आहोत व त्यायोगे प्रत्येक शालेय दिवशी २५,००० हून अधिक मुलांना पौष्टिक भोजन पुरविले जाईल याची काळजी आम्ही घेणार आहोत. हा उपक्रम केवळ शैक्षणिक सर्वोत्कृष्टतेला पाठबळ पुरवित नाही तर अधिक चांगल्या आरोग्याचा पुरस्कार करून व स्थानिक पातळीवर आर्थिक संधी निर्माण करून आपल्या समजाची वीण अधिक घट्ट करतो. डॉएच बँकेकडून गेल्या अनेक वर्षांपासून आम्हाला मिळत आलेल्या पाठबळासाठी आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहोत. त्याचबरोबर आम्हाला राज्यातील मुलांना सेवा पुरविण्याची संधी दिल्याबद्दल आम्हाला महाराष्ट्र सरकारचेही आभार मानायचे आहेत. प्रभावशाली कामगिरी करण्याच्या व आमची सेवा घेणाऱ्या प्रत्येक मुलातील क्षमतेची जोपासना करण्याच्या कामी आमची मदत करण्यामध्ये त्यांचे सक्रिय योगदान राहिले आहे.”
वर्ष २०१४ पासून डॉएच बँकेने जयपूर, बेंगळुरू आणि पुण्यातील विद्यार्थ्यांना मध्यान्ह-भोजन पुरविण्याच्या अक्षय पात्रच्या प्रयत्नांना पाठबळ पुरविले आहे. गेल्या दशकभरातील कालावधीमध्ये या भागीदारीतून मुलांना ८ कोटींहून अधिक भोजन पुरविण्याचे कार्य उभे राहण्यास मदत झाली आहे, ज्यामुळे वंचित समुदायांसाठी शैक्षणिक संधींमध्ये सुधारणा झाली आहे. पुण्यातील किचनव्यतिरिक्त गांधीनगर, अहमदाबादमधील आणखी २,००० मुलांच्या भोजनासाठी निधीपुरवठा करून डॉएच बँकेने अक्षय पात्रला मदत केली आहे.
अक्षय पात्र फाऊंडेशन बाबत
अक्षय पात्र फाऊंडेशन ना-नफा तत्त्वावर आधारित संस्था आहे, जी भारतातील वर्गामध्ये लागणारी भूक आणि कुपोषणाचे निराकरण करण्याचा प्रयत्न करते. सरकारी व सरकार-अनुदानित शाळांमध्ये पीएम पोषण स्किम राबवत अक्षय पात्रचा भूकेचे शमन करत शाळेमध्ये मुलांना आणण्याचा मनसुबा आहे. २००० पासून अक्षय पात्रने प्रत्येक शालेय दिवसामध्ये मुलांना पौष्टिक आहार देण्याप्रती काम केले आहे. फाऊंडेशन तंत्रज्ञानाचा फायदा घेत लाखो मुलांच्या गरजांची पूर्तता करत आहे. त्यांचे अत्याधुनिक किचन्स प्रबळ बनले असून जगभरातील उत्सुक अभ्यागतांचे लक्ष वेधून घेत आहेत.
भारत सरकार आणि विविध राज्य सरकारांच्या पाठिंब्यासह पीएम पोषणची अंमलबजावणी सहयोगी अक्षय पात्र पाच शाळांमधील फक्त १,५०० शालेय मुलांना आहार देणारी सुरूवातीच्या संस्थेवरून सर्वात मोठी (ना-नफा तत्त्वावर संचालित) शालेय आहार उपक्रम बनली आहे. फाऊंडेशन १६ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमधील ७५ ठिकाणी असलेल्या किचन्सच्या नेटवर्कला पौष्टिक आहार देते, ज्यामुळे आम्ही २३,००० हून अधिक शाळा व अंगणवाडींमधील २.२५ दशलक्षहून अधिक लाभार्थीपर्यंत पोहोचू शकलो आहोत.