कबीर भारतातील महान संतः आचार्य सोनग्राएमआयटी डब्ल्यूपीयूत आचार्य रतनलाल सोनग्रा यांचा विशेष सत्कार‘कबीर वाणी’ पुस्तकाला दिल्लीत मिळाला ‘सदगुरू संत कबीर राष्ट्रीय अवार्ड’

Spread the love

पुणे, दि. १४ डिसेंबर: ,” कबीरांचा समाजावर प्रचंड प्रभाव होता. १५ व्या शतकातील संत कबीरांच्या काळात कोणतिही साधन सामुग्री नसतांना त्यांचे विचार संत तुकारामापर्यंत पोहचणे ही त्यांच्या दोहेची ताकद आहे. डॉ. बाबासाहेबांचे दुसरे गुरू संत कबीर असून डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनाची शेवटची रात्र ही कबीरांचे तत्वज्ञान वाचन घालविले होते. ते भारतातील एक महाना संत होते.” असे विचार प्रसिद्ध लेखक आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आचार्य रतनलाल सोनग्रा यांच्या अभिजात मराठीचा महाग्रंथ ‘कबीर वाणी’ ला नुकताच दिल्ली येथे अखिल भारतीय दलित साहित्य अकादमीचा ‘सदगुरू संत कबीर राष्ट्रीय अवार्ड’ प्राप्त झाला आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी च्या वतिने डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ देऊन विशेष सम्मान करण्यात आला.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण आणि गिरीश दाते उपस्थित होते.
डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, साहित्य क्षेत्राचा समाजावर सकारात्मक परिणाम होत असतो. संत साहित्यामुळे समाजाला योग्य दिशा मिळते. संत ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज आणि कबीर यांचे दोहे हे मानवाच्या सुख, समाधान व कल्याणासाठी आहे.
यानंतर डॉ. एस.एन.पठाण, अरूण खोरे, डॉ. संजय उपाध्ये यांनी विचार मांडले.

जनसंपर्क विभाग,
एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *