शालेय विद्यार्थ्यांनी साजरा केला द ग्रेटेस्ट शो मॅन राज कपूर यांचा वाढदिवस

Spread the love

पुणे : भारतीय सिनेसृष्टीतील द ग्रेटेस्ट शो मॅन राज कपूर यांचा शंभरावा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसमवेत साजरा करण्यात आला. साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट व श्री शिवाजी मित्र मंडळातर्फे शनिवारी (दि. 14) सोमवार पेठेतील आबासाहेब अत्रे प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना साईनाथ मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा यांची होती. अत्रे शाळेतील सुमारे 60 विद्यार्थ्यांनी राज कपूर यांचे मुखवटे लावून गायक मुकेश यांच्या आवाजातील गाण्यावर ताल धरला. पृथ्वीराज साळुंखे या बालकलाकाराने राज कपूर यांच्या पेहरावात ‌‘जीन यहाँ मरना यहाँ‌’ या गीतावर नृत्य सादर केले. व्हॉईस ऑफ मुकेश अशी ओळख असलेले पपिशकुमार यांनी राज कपूर यांच्यावर चित्रित झालेली आणि मुकेश यांनी गायलेली गीते या प्रसंगी सादर केली. सुरुवातीस पियूष शहा यांनी राज कपूर यांच्या चित्रपट सृष्टीतील योगदानाविषयी माहिती दिली. श्री शिवाजी मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद थोरात, अत्रे शाळेचे मुख्याध्यापक प्रविण सुपे, हरेश पैठणकर, केशव तळेकर, एस. जे. डान्स अकॅडमीच्या श्रद्धा जाधव, ज्येष्ठ गायक उमेश तडवळकर, गंधाली शहा, नरेंद्र व्यास, ऋत्विक अडमुलवार, गणेश गोळे, प्रथमेश अडमुलवार, दाजी चव्हाण, मिलन म्हेत्रे आदी उपस्थित होते.
फोटो : साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट व श्री शिवाजी मित्र मंडळातर्फे शनिवारी राज कपूर यांच्या वाढदिवस साजरा केला. अत्रे शाळेतील विद्यार्थ्यांनी राज कपूर यांचे मुखवटे लावून आनंद व्यक्त केला.
प्रति,
मा. संपादक
साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट व श्री शिवाजी मित्र मंडळातर्फे द ग्रेटेस्ट शो मॅन राज कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. 14) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
पियूष शहा, अध्यक्ष, साईनाथ मित्र मंडळ ट्रस्ट
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *