पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन (ESG) धोरणांवर जागतिक परिषदेचे आयोजन ग्लोबल ईएसजी कॉन्क्लेव्ह आणि कोपॅथॉन २०२५

Spread the love

पुणे, प्रतिनिधी – श्री बालाजी विद्यापीठ पुणे आणि सीएनआरआयच्या सहकार्याने पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ईएसजी) संदर्भात जागतिक परिषद म्हणजेच ग्लोबल ईएसजी कॉन्क्लेव्ह २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. हि परिषद शाश्वत विकास आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ईएसजी) तत्त्वांना सहकारी आणि व्यवसाय धोरणांमध्ये एकत्रित करण्यावर केंद्रित असेल. २३ आणि २४ जानेवारी रोजी श्री बालाजी विद्यापीठ येथे हि परिषद होणार आहे.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे, माजी खासदार आणि WCoPEF तसेच IFFCO चे अध्यक्ष आणि NCUI चे अध्यक्ष दिलीप संघानी, नॅशनल हाऊसिंग बँकेचे सेंट्रल बोर्ड ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे हे परिषदेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थतीत असणार आहेत. या कार्यक्रमात पर्यावरणीय शाश्वतता, युवा सक्षमीकरण, लिंग समानता आणि पारदर्शक प्रशासन, जागतिक नेते, धोरणकर्ते आणि तज्ञांमध्ये सहकार्य वाढवणे आणि शाश्वत विकास उद्दिष्टांशी (SDGs) सुसंगत अंतर्दृष्टी आणि उपाय सामायिक करणे यासारख्या प्रमुख विषयांवर चर्चा केली जाईल.

या परिषदेबरोबरच एसडीजी आव्हानांसाठी उपाय तयार करण्यासाठी “कूपॅथॉन २०२५”चे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने तरुण संशोधक सहभागी असतील. सहकारी उद्योजकतेवर लक्ष केंद्रित केलेल्या या उपक्रमाचे उद्दिष्ट तरुणांना सक्षम करणे आणि प्रभावी, स्केलेबल कल्पना विकसित करणे आहे. येथील विजेत्या झालेल्या उपाय योजनांना मान्यता आणि संभाव्य जागतिक संधी मिळतील. या एकत्रित प्रयत्नाचे उद्दिष्ट शाश्वत, समावेशक आणि समतापूर्ण भविष्याकडे प्रगती साधणे आहे.

श्री बालाजी विद्यापीठ, पुणे (SBUP), जागतिक सहकारी आर्थिक मंच (WCooPEF), ग्रामीण भारतातील स्वयंसेवी संस्थांचे संघटन (CNRI), भारतीय लोक प्रशासन संस्था (IIPA), लेहाई विद्यापीठ, वनराई, जागतिक वाणिज्य आणि उद्योग मंच (GFCI), इंडो-पॅसिफिक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (IPCCI) यांच्या वतीने सहकारी इको फ्रेमवर्कद्वारे पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासन (ESG) धोरणांवर जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. WcooPEF संस्थापक कार्यकारी अध्यक्ष, CNRI सरचिटणीस, रोझ मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे सह-अध्यक्ष विनोद आनंद, श्री बालाजी विद्यापीठ, पुणे (एसबीयूपी)चे कुलगुरू प्रा. बी. परमानंदन, डॉ. मनीषा पालीवाल (प्रमुख, सृजन-संपादक, उपप्रमुख, संशोधन आणि विकास कक्ष, श्री बालाजी विद्यापीठ, पुणे (SBUP)), वनराई संस्थेचे विश्वस्त सागर धारिया, सचिव अमित वाडेकर आणि इतर संस्थेचे पदाधिकारी यावेळी पत्रकार परिषदेस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *