पीवायसी हिंदू जिमखाना आणि दोशी इंजिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने अँडव्हान्स क्रिकेट अकादमीची स्थापना

Spread the love

या अकादमीतून केवळ पीवायसीलाच नाही, तर भारतासाठी खेपीवायसी हिंदू जिमखाना आणि दोशी इंजिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने अँडव्हान्स क्रिकेट अकादमीची स्थापनाळणारे खेळाडू उदयास येतील : एमसीए अध्यक्ष रोहित पवार 

पुणे, 25 जानेवारी 2025: पुण्यातील ऐतिहासिक क्रिडा संस्था असलेल्या पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या वतीने व दोशी इंजिनियर्स यांच्या सहकार्याने 14, 16 व 19 वर्षाखालील खेळाडूंसाठी तसेच, महिला व पुरुषांसाठी आधुनिक सुविधा असलेल्या क्रिकेट अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. गुणवान व उदयोन्मुख क्रिकेट पटूना जागतिक दर्जाच्या सुविधांसह विनामूल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे व त्यांना सर्वोच्च स्तरावर उत्तम कामगिरी करण्यासाठी संधी मिळवून देणे हा या अकादमीचा उद्देश आहे. यातील प्रत्येक वयोगटासाठी गेल्या तीन महिन्यांत संपूर्ण राज्यभरात पार पडलेल्या निवड चाचणीतून जिल्ह्यातील 500 हून अधिक खेळाडूंमधून निवडण्यात आलेल्या 20 खेळाडूंचा समावेश असणार आहे. 

या अकादमीचे उदघाटन महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार व दोशी इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित दोशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी क्लबचे खजिनदार चंद्रशेखर नानिवडेकर, एमसीएचे माजी अध्यक्ष विकास काकतकर, अभिषेक ताम्हाणे, ज्योती गोडबोले, तन्मय आगाशे, शिरीष साठे, आमोद प्रधान, सिद्धार्थ भावे,  महेंद्र गोखले, एमसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी, एमसीए एपेक्स कौन्सिल समिती सदस्य विनायक द्रविड, रोहित मेहेंदळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे महाराष्ट्र क्रिकेटसाठी मोठे योगदान आहे. दोशी इंजिनियर्सच्या सहाकार्याने सुरु होणारी ही अकादमी हे त्याचे पुढचे पाऊल आहे. अकादमीसाठी संपूर्ण ५० लाख रुपयाचे अर्थसहाय्य करणाऱ्या अमित दोशी आणि दोशी कुटुंबियांचे जेवढे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यांनी ही मदत प्रायोजक म्हणून केली असली, तरी मी तसे मानत नाही. ही मदत भविष्यात उदयास येणाऱ्या क्रिकेटपटूंना आहे असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले. 

पीवायसी आणि दोशी इंजिनियर्सच्या सहकार्याने सुरु होणाऱ्या १४, १६ आणि १९ वर्षांखालील क्रिकेट अकादमीचे उदघाटन रोहित पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या अकादमीतून अनेक युवा खेळाडू घडणार आहेत. बीसीसीआयचे प्रशिक्षक येथे काम करणार असल्याने खेळाडूंना अचूक आणि योग्य मार्गदर्शन मिळेल यात शंकाच नाही. त्यामुळे अकादमीतून केवळ पीवायसीलाच नाही, तर भारतासाठी खेळणारे खेळाडू उदयास येतील असा विश्वासही श्री. पवार यांनी व्यक्त केला. 

श्री. पवार यांनी या वेळी पीवायसीच्या क्रिकेट योगदानाची देखिल दखल घेतली. या क्लबला शतकाहून अधिक वर्षे झाली.  क्रिकेट आणि क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी हा क्लब सुरु झाला. इतक्या वर्षानंतरही क्लबची वचनबद्धता कायम आहे.  पुण्यातील काही जिमखान्यामुळे महाराष्ट्रातील क्रिकेट सुरु झाले. यात पीवायसीचा वाटा मोठा होता. भालेकर करंडक आणि मांडके करंडकासाठी जुनी स्पर्धा पीवायसी अखंडितपणे चालवत आहे. केवळ क्रिकेटच नाही, तर बॅडमिंटन, बुद्धिबळ अशा विविध खेळांनाही या क्लबने व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. हे त्यांचे मोठेपण आहे, असे श्री. पवार म्हणाले.

पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे याप्रसंगी म्हणाले की, या विनामूल्य क्रिकेट अकादमी व प्रशिक्षण सुविधेचे उदघाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. युवा खेळाडूंना त्यांचे कौशल्य विकसित करण्यासाठी सर्वोत्तम सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. गुणवान खेळाडूंना प्रत्येक स्तरावर पाठिंबा देणे हेच पीवायसीचे उद्दिष्ट असून ही अकादमी म्हणजे त्यादिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे. हे आमचे स्वप्न साकार करण्यासाठी दोशी इंजिनियर्स यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. 

दोशी इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित दोशी म्हणाले की, पीवायसी हिंदू जिमखानाच्या भागीदारीत युवा खेळाडूंसाठी इतकी रोमांचकारी सुविधा उपलब्ध करून देताना आम्हीही रोमांचित झालो आहोत. युवकांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी आणि युवा पिढी शिस्तबध्द होण्यासाठी क्रिडा क्षेत्राचा वाटा मोलाचा असतो असा आमचा विश्वास आहे. या गुणी खेळाडूंना पाठिंबा दिल्यामुळे भारतीय क्रिकेटचे भवितव्य घडविण्यात वाटा उचलत असल्याची आमची भावना आहे.

पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव दिपक गाडगीळ म्हणाले की, हि अकादमी म्हणजे पीवायसीच्या वाटचालीतील एक ऐतिहासिक पाऊल असून पुणे व महाराष्ट्रातील क्रिडा क्षेत्रासाठी आमच्या निष्ठेचेही ते प्रतीक आहे. या विनामूल्य क्रिकेट अकादमी च्या माध्यमातून गुणवान खेळाडूंना संधी व गुणवत्तेची जोपासना असे दोन्ही हेतू साध्य करण्याचे आमचे लक्ष्य आहे.
पीवायसी हिंदू जिमखानाचे सहसचिव सारंग लागू म्हणाले की, या अकादमीचा एक घटक असल्याचा आम्हाला अभिमान असून गुणवान खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध करून देणे यामुळे शक्य होणार आहे. आमचे तज्ञ प्रशिक्षक व सर्वोत्तम सुविधा यामुळे राज्यातील युवा खेळाडूंसाठी ही अकादमी नवा अध्याय ठरणार आहे. या खेळाडूंना प्रशिक्षित करून सर्वोच्च स्तरापर्यंत कामगिरी करताना त्यांना पाहणे आमच्यासाठी आनंददायक असेल. 

पीवायसीचे क्रिकेट विभागाचे सचिव अविनाश रानडे म्हणाले की, या अकादमीच्या माध्यमांतून खेळाडूंचे सर्वांगीण कौशल्य, तंदरुस्ती व खेलविषयीचा दृष्टिकोन घडविण्याचा आमचा मानस आहे. प्रत्येक टप्प्यावर तज्ञ प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, गुणवान खेळाडूंना फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातील कौशल्य विकसित करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण सत्रांमधून जावे लागणार असून त्याबरोबरच सांघिक भावना आणि शिस्त हे गुण त्यांच्यात रुजविण्याचा आमचा प्रयत्न असेल. 
ते पुढे म्हणाले की, भारतीय क्रिकेट मधील भावी स्टार खेळाडू घडविण्यासाठी ही अकादमी साहाय्य भूत ठरेल. त्यासाठी भक्कम पाया आणि उच्च दर्जाच्या प्रशिक्षणातून प्रगती हे आमचे लक्ष्य असून महाराष्ट्रातील उदयोन्मुख व गुणवान खेळाडूंमधून देशासाठी आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्याकरिता पीवायसी हिंदू जिमखाना आणि दोशी इंजिनियर्स यांनी आपली कटिबध्दता या प्रकल्पातून दाखवून दिली आहे.

यामध्ये अकादमीचे संचालक निरंजन गोडबोले(बीसी सीआय लेव्हल 2, इसिबी लेव्हल 2, माजी प्रथम श्रेणी खेळाडू), इंद्रजीत कामतेकर (बीसीसीआय लेव्हल 2, इसिबी लेव्हल 2, माजी प्रथम श्रेणी खेळाडू), पराग शहाणे (बीसीसीआय लेव्हल 2,माजी प्रथम श्रेणी खेळाडू) आणि चारुदत्त कुलकर्णी(बीसी सीआय लेव्हल 2, इसिबी लेव्हल 2, माजी प्रथम श्रेणी खेळाडू) यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *