पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान व करम प्रतिष्ठान आयोजित गझल प्रतिभा पुरस्कार वितरण सोहळा व मराठी स्वरचित गझल संमेलन रविवारी होत आहे.
प्रतिष्ठेच्या गझल प्रतिभा पुरस्काराने कवयित्री, कझलकारा सानिका दशसहस्र यांना गौरविले जाणार असून कार्यक्रम रविवार, दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर निमंत्रितांचे गझल संमेलन आयोजित करण्यात आले असून यात प्रभा सोनवणे, मिलिंद छत्रे, अमृता जोशी, नूतन शेटे, भालचंद्र कुलकर्णी, शैलजा किंकर, योगेश काळे, स्मिता जोशी-जोहरे, डॉ. मृदुला कुलकर्णी, सुहास घुमरे, रुपाली अवचरे यांचा सहभाग असणार आहे, असे प्रज्ञा महाजन आणि मैथिली आडकर यांनी सांगितले.
फोटो : सानिका दशसहस्र