डीआरडीओतील शास्त्रज्ञ, संशोधकांनी जाणला तानाजी मालुसरे यांच्या शौर्याचा इतिहास

Spread the love

पुणे : डीआरडीओच्या पुणे येथील उच्च उर्जा पदार्थ अनुसंधान प्रयोगशाळेतर्फे राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या कॅम्पमध्ये डीआरडीओच्या राष्ट्रीय पातळीवरील जवळपास 100 शास्त्रज्ञ व संशोधकांनी सहभाग घेत किल्ले सिंहगडावर यशस्वी ट्रेक केला.
शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी अभ्यासपूर्ण व अमोघ वाणीद्वारे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा त्याग व बलिदानाबाबतचा इतिहास सांगितला. कल्याण दरवाजा, तानाजीकडा येथील रणसंग्राम प्रत्यक्षात पाहतोय अशी अनुभूती शास्त्रज्ञ व संशोधकांना आली. किल्ले सिंहगडाचा इतिहास, शिवकालीन युद्धनीती व शस्त्रास्त्रांचे वैशिष्ट्य या बाबतही कर्डे यांनी मार्गदर्शन केले.
सुभेदार तानाजी मालुसरे यांनी कर्तव्यनिष्ठेबाबत स्थापित केलेल्या उदाहरणातून प्रेरणा घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
या प्रसंगी किल्ले सिंहगडावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. एचईएमआरएल व एआरडीई यांच्यामार्फत वनविभागास चार कचरापेट्या देण्यात आल्या.
या प्रसंगी संचालक अनिल प्रसाद दास, संचालक डॉ. हिमांशू शेखर, व्यवस्थापक संजीव गुप्ता, क्रीडा विभाग सचिव शिशिर कुमार श्रीवास्तव व डीआरडीओ वेस्ट झोन स्पोर्ट्स काऊन्सिलचे अध्यक्ष के. पी. सी. राव, सचिव चेतन सोळंकी व खजिनदार तृप्ती पटेल उपस्थित होते.
एचईएमआरएल स्पोर्ट्स कमिटीमधील कृष्णकांत जाधव, सिद्धार्थ गायकवाड, जितेंद्र भेगडे, मोरेश्वर देशपांडे, जितेंद्र राऊत, संजय लोहकरे व मुरली शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

फोटो ओळ : डीआरडीओतील शास्त्रज्ञ, संशोधकांना सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा सांगताना सौरभ कर्डे.

प्रति,
मा. संपादक
डीआरडीओच्या पुणे येथील उच्च उर्जा पदार्थ अनुसंधान प्रयोगशाळेतर्फे राष्ट्रीय ट्रेकिंग कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
अमित जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *