पुणे :- निसर्गाने कुठलारी खर्च न करता कार्बन कमी करण्याचे नैसर्गिक यंत्र दिले आहे. ते म्हणजे वृक्ष.एक झाड लाखो पटीने वातावरणातील कार्बन कमी करते. त्यामूळे ज्याने झाड लावले, संगोपन करून मोठे केले त्यांना कार्बन कमी करण्याचे क्रेडिट मिळायला हवे. झाडे लावा, जगवा आगि उत्पन्न मिळावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आणि देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मां के नाम या अभियानाने प्रेरित होऊन… एक पेड माँ के नाम… कार्बन क्रेडिट युवाओं के नाम… या उद्देशाने महाराष्ट्रात लवकरच ५ कोटी वृक्षांची लागवड करुन शेतकऱ्यांना ‘कार्बन क्रेडिट’च्या माध्यमातून थेट शेतकयांना उत्पन्न मिळवून देण्याची मोहिम स्वान रिर्सच अँड सोशल स्टडी फाउंडेशन आणि शाश्वत पालघर शेती उत्पादक कंपनी यांच्या संयुक्तविद्यमाने मोहीम सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती स्थान फाउंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, सचिव सांरग नेरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी, सायबर तज्ज्ञ असंग रामटेके, अजित कारके, विकास सोनकांबळे, रत्नदिप सरवदे उपस्थित होते.
शशिकांत कांबळे पुढे म्हणाले, राज्यात औद्यागिकीकरण वाढत असत्यामूळे होणारी पर्यावरणाची हानी टाळतानाच शेतकरी, संस्था , व नागरिकांना उत्पन्नाचा स्रोत’ ठरणारी ही मोहिम असेल, शेतकऱ्यांना आपल्या शेतात, संस्थाना आवारात आणि सामान्य नागरिकांना मुबलक जागा असेल तर झाडे लावून कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून २० वर्ष उत्पन्न मिळवता येईल.
स्वान फाऊंडेशनचे सचिव व शाश्वत पालकार शेती उत्पादक. कंपनीचे संचालक सांरंग नारनेरकर टोरंटो विद्यापीठातून यांनी इलेट्रिकल आणि कॉम्यूटर इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली असून विद्यार्थी दशेतच अनेक क्षेत्रात त्यांनी संशोधन केले आहे. स्पेस आणि मिशन प्लेनिगमध्ये संशोधन करून त्याचे सादरीकरण बापार व्हॉएजर नावाच टूल बनवल्यानंतर त्याच सादरीकरण नासा समोर करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. आतापर्यंत 13 पेटेस त्यांच्या नावावर आहेत.सारंग नेरकर यावेळी बोलताना म्हणाले, जागतिक तापमानात वाढ. रोखण्यासाठी व पुढील पिढीला शुद्ध हवा, शुद्ध पाणी मिळण्यासाठी कार्बन क्रेडिट आवश्यक आहे. चीन २८%, अमेरिका १५%, भारत ७% रशिया ५%, जपान ३% युरोपीयन देश २२%, ही स्थिती बदलण्यासनि मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑकमाइज्चे स्थिरीकरण होणे आवश्यक आहे. जागतिक बँकेच्या ग्लोबल यूथच्या क्लायमेट नेटवर्कच्या भारतासाठीचा हवामान इव दूत म्हणून काम करताना कृषि क्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना कसे जास्त उत्पन्न मिळवू शकते यावर जास्त प्रमाणात लक्ष केद्रित केले. यातूनच कार्बन क्रेडिट च्या माध्यमातून थेट शेतकयांना कसे उत्पन्न मिळेल यासाठी आम्ही २०२१ मध्ये काम सुरु केले. वृक्ष लागवड झाल्यानंतर झाडाचे मूल्यमापन करण्यासाठी मी AI तंत्रज्ञाना वर आधारित एक तंत्रज्ञान विकसित केले व त्याचे पेंट्स घेतले. शेतकऱ्यांना थेट उत्पन्न मिळण्यासाठी शेतकयांची भागिदारी असलेली शाश्वत पालघर शेती उत्पादक कंपनी जागतिक बँकेच्या मार्गदर्शना खाली रजिस्टर केली व पालघर कार्बन क्रेडिटचा पायलट प्रकल्प सुरु केला. आजमितीला ८,५०० शेती शेतकरी सहभागी असून १५ लाख झाडांची लागवड झाली आहे. या कार्बन क्रेडिटचे ऑडिट होऊन शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. या यशस्वी प्रयत्नानंतर आम्ही महाराष्ट्रात लवकरच 5कोटी झांडाची लागवड करून थेट शेतकऱ्यांच्या अंकाऊटला पैसे जमा करणार आहोत.
विकास सोनकांबळे म्हणाले की, ज्या २०२१ नंतर ज्या शेतकन्यांनी वृक्ष लागवड केली आहे. अशा शेतकयांना देखिल कार्बन क्रेडिट चा लाभ घेता येणार आहे. ही कार्बन क्रेडिट थी मोहम जास्तीत ‘ जास्त लोकाभिमुख करण्यासाठी व येणाऱ्या वर्षभरात 5कोटी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून लाखो शेतकयांना उत्पन्न मिळणार आहे. या साठी आपल्या माध्यमातून आम्ही आवाहन करत आहोत करत आहोत की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे.