श्री. रामहरी कराड
व्यवस्थापकीय संचालक,
आ.के. मिडिया सोल्यूशन्स, पुणे.
एन्ट्रो
माणूस आणि समाज यांच्यातल्या निकोप नात्यातूनच आदर्श राष्ट्राची उभारणी होते, यावर ठाम विश्वास असलेल्या प्रा.डॉ. विश्वनाथ कराड सरांनी समाजाची मनोधारणा बदलण्याचे धाडस करून शिक्षण क्षेत्रात लावलेल्या रोपाचा आज वटवृक्ष झाला आहे. त्यांनी आपल्या कल्पकतेतून ५ विद्यापीठांची निर्मिती करून या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीत शिक्षण व आध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कार्याच्या हा लेखा जोखा. ३ फेब्रुवारी रोजी ते वयाच्या ८५ व्या वर्षात पर्दापण करीत असतांना त्यांनी केलेल्या विविध कार्याचा एक संक्षिप्त आढावा घेतला तर त्यांच्या कार्याची प्रचिती लक्षात येतेस्वामी विवेकानंद यांना आपल्या जीवनाचा आदर्श मानणारे प्रा.डॉ. विश्वनाथ दादाराव कराड यांच्या जीवनाचे विविध पहलू पावलो पावली पहायला मिळतात. आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर गरूड झेप घेऊन शैक्षणिक, आध्यात्मिक व सामाजिक जीवनात त्यांनी विकास साधला. जीवनात यश, किर्ती, सारख्या सर्वच भौतीक गोष्टी साध्य झाल्यानंतर आध्यात्मिक गोष्टीचे जीवनात अतिशय महत्व आहे. हे ओळखून त्यांनी जगात विश्वशांती नांदावी यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
गाईच्या गोठ्यात अ, आ, ई चे धडे गिरविल्यानंतर डॉ. विश्वनाथ कराड यांनी स्वतःला शिक्षणाच्या प्रवाहात झोकून घेतले. पुढे उच्च शिक्षणासाठी पुणे येथील इंजिनियअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून पदवी मिळवली. येथेच त्यांनी प्राध्यापक म्हणून २० वर्ष नोकरी केली. स्वतः काही वेगळे करायचे आणि त्या माध्यमातून संपूर्ण समाजाचा विकास साधायचे हे सूत्र लक्षात ठेवून ते कार्य करीत होते. शिक्षणातूनच सर्वांगिण विकास होतो. त्यामुळे महाराष्ट्रात खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले ते कधीही कोणीही विसरू शकणार नाही. यातूनच माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे बीज पेरल्या गेले. आज या बिजाचे रूपांतर वटवृक्षात झालेले आहे. शिक्षणात सातत्य नव नवीन प्रयोग करून त्यांनी विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय साधून शिक्षणाची धाराच बदली. देशाच्या प्रगतीसाठी युवा पिढी ही विज्ञानाधिष्ठीत असावीच परंतू त्यांच्यामध्ये आध्यात्मिक बीजे ही पेरली जावे. यासाठी डॉ. कराड हे आजच्या क्षणापर्यंत कठोर प्रयत्न करीत आहेत.
आज विश्वात अशांती आहे. तोफ, बंदूक, बाँब, अणूउर्जा, नॅट्रोजन बाँब आणि युद्धामुळे दहशत निर्माण झाली आहे. साम्यवाद, समाजवाद आणि भांडवलशाहीने मनात एक गोंधळ उडाला आहे. या दोघांच्या वादळामुळे विश्वाच्या कणा कणात अशांती निर्माण झाली आहे. या स्वरूपात दिसणारी शांती इतकी नाजूक आहे की कोणत्याही क्षणी विनाशकारी स्फोट होऊ शकतो. अशाप्रकारे बर्याच वर्षापासून अशांत वातावरणात जगण्याची इच्छा ही वैश्विक शांततेसाठी होती. यामुळेच प्रत्येक देश हा शांततेचा नारा देतांना दिसत आहे. ईश्वरीय शांतीचा संदेशवाहक म्हणून सृष्टिवरील आळंदीत समाधीस्त होणारे तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी दिलेला विश्वात्मक संदेश हा मानवजातीच्या उध्दारासाठी एक आशेचा किरण आहे. त्यांच्या विचारांचे पाईक व विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दादाराव कराड यांनी लोणी काळभोर येथे तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या नावाने निर्मित केलेला जगातिल सर्वात मोठा घुमट. देशासाठी समर्पित या घुमटाच्या माध्यमातून या संताचा संदेश संपूर्ण जगात पोहचविण्यासाठी ते अथक प्रयत्न करीत आहेत. हा घुमट विश्व शांती आणि मानवतेचा संदेश देणारी प्रयोगशाळाच आहे. ही मानवी इतिहासातील प्रथमच अशा प्रकारची वास्तू निर्माण झाली आहे. या वास्तूमध्ये संत, शास्त्रज्ञ व तत्वज्ञ यांचे पुतळे बसविण्यात आले आहेत.
भविष्यात संपूर्ण जगात राजबाग लोणीकाळभोर येथून शांतीचे किरण पसरतील त्यासाठी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी येथे श्रीमद भगवद्गिता ज्ञान भवनाची निर्मिती केली. भगवान कृष्णांनी अर्जुनाला जो संदेश दिला त्याची जिवंत प्रतिकृती येथे पहायला मिळते. या भवनात संपूर्ण जगातील प्रमुख धर्मग्रंथामीधल मानवी कल्याणाचे तत्वज्ञान, तसेच जगातील सर्व धर्मग्रंथ हे खरे जीवनग्रंथच आहे याचे साक्षात दर्शन घडते.या श्रीमदभगवदगीता ज्ञानभवनाच्या प्रवेशाद्वाराशी दिव्य ज्ञान यज्ञ कुंड उभारण्यात आले असून त्यातील ज्ञान ज्योती ही प्रत्येक मानवाच्या मनातील शांतीची ज्योती प्रज्वलीत करण्यास मदत करेल.
त्याच प्रमाणे येथे श्री विश्वदर्शन देवता मानवता भवनाची निर्मिती करून सर्व मानवजातीला शांतीचा संदेश दिला जात आहे. या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा नवा संदेश दयावयाचा आहे. वसुधैव कुटुम्बकमची संकल्पना साकार करून मानवी सहिष्णूतेचा संदेश येथून दिला जात आहे. या देशात ज्ञानाची पूजा आणि अंतिम सत्याचा शोध घेतला जातो. हाच संदेश सत्यात उतरविण्यासाठी डॉ. कराड हे प्रयत्न करतांना दिसतात. ते सतत म्हणतात की, स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्यानुसार माझी भारत माता २१ व्या शतकात जगासमोर ज्ञानाचे दालन व विश्व गुरू म्हणून उदयास येईल. जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती असो त्यामुळे भारतीय संस्कृती, परंपरा, तत्वज्ञान, विश्व शांती आणि मानवतेचा संदेश जगभर पोहचेल आणि हे कार्य विश्व गुरू होण्याच्या दृष्टीने एक सुवर्ण पाऊल असेल.
एकंदरीतच डॉ. विश्वनाथाची आयुष्य भराची तपस्या म्हणजे विश्वशांतीसाठी केलेले कार्य. आज त्यांच्या ८५ व्या वाढदिवसा निमित्त ऐवढेच म्हणू शकतो की
कर्म तपांचे यश कीर्तीचे, जीवन अवघे कृतार्थतेचे,
व्यक्ती ने विश्वाचे चिंतन, विश्वशांतीचे ध्येय चिरंतन,
विश्वविक्रमी घुमट शांतीचा कळसच जो या तृप्त पथाचा.
अशा या ज्ञान तपस्वी व विश्वशांतीची ज्योती प्रज्वलीत करणार्या प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.