पुणे, 7 मार्च २०२५: बँक ऑफ इंडिया (बीओआय) ने देशभरात १११ नवीन शाखांचे उद्घाटन करून आपला विस्तार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक यांच्या नेतृत्वाखाली वर्चुअल उद्घाटन करण्यात आले, ज्यामुळे बँकेची आर्थिक समावेशन आणि ग्राहकांची प्रवेशयोग्यता वाढवण्याची वचनबद्धता दृढ झाली आहे. नवीन उद्घाटन केलेल्या शाखा अनेक शहरांमध्ये पसरलेल्या आहेत, ज्यामुळे बँक ऑफ इंडियाची देशव्यापी उपस्थिती आणखी मजबूत झाली आहे. हैदराबाद एफजीएमओ (फील्ड जनरल मॅनेजर ऑफिस) मध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे, ज्यामध्ये सतर नवीन शाखांचा समावेश आहे. चेन्नई एफजीएमओ मध्ये चौदा नवीन शाखांसह लक्षणीय वाढ झाली आहे. पुणे क्षेत्रात, तेरा शाखांसह विस्तार केला आहे आणि नवी दिल्लीत बारा नवीन शाखा सुरू केल्या आहेत.
भोपाळ क्षेत्रा ने अकरा शाखांसह विस्तार केला आहे. चंदीगड आणि लखनऊ मध्ये प्रत्येकी दहा शाखांचे उद्घाटन केले आहे. विस्ताराबद्दल भाष्य करताना, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रजनीश कर्नाटक म्हणाले: ” हा विस्तार आमची उपस्थिती प्रमुख शहरी आणि उपनगर व ग्रामीण भागातील केंद्रांमध्ये मजबूत करत ग्राहकांना उत्तम बँकिंग सेवा देण्यास प्रयत्नशील आहोत. बँकेच्या शाखांचे नेटवर्क वाढवून, ग्राहकांची सोयीसुविधा सुधारण्याचे आणि अधिक वैयक्तिकृत बँकिंग अनुभव प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवल आहे. आम्ही आर्थिक समावेश करण्यासाठी, लहान व्यवसायांना समर्थन देण्यासाठी आणि व्यक्तींना वाढ आणि प्रगतीसाठी आवश्यक संसाधने प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत. हा उपक्रम आर्थिक समावेशन चालवण्याच्या आणि राष्ट्राच्या आर्थिक वाढीस हातभार लावण्याच्या आमच्या व्यापक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.”