फेडएक्सने ‘सक्षम’च्या माध्यमातून महिला उद्योजकांच्या वृद्धीतील सातत्य राखले

Spread the love

मुंबई, भारत, 07 मार्च 2025: जगातील सर्वात मोठी एक्सप्रेस वाहतूक कंपनी फेडरल एक्सप्रेस कॉर्पोरेशन (“FedEx”) ही सलग चौथ्या वर्षी सक्षम उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील सर्वसमावेशक उद्योजकतेला प्रोत्साहन देत आहे. या वर्षी सक्षम उपक्रमाने 270 पेक्षा अधिक महिला उद्योजक तसेच जवळपास 160 LGBTQIA+ कम्युनिटी सदस्यांना सक्षम केले. या उद्योजकांना त्यांच्या गरजांनुसार, व्यावसायिक साहित्य असलेली सक्षम किट, मार्गदर्शन आणि विशिष्ट उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमाद्वारे टिफिन सेवा, टेलरिंग, हस्तकला, खाद्यपदार्थ सेवा आणि ब्युटी या क्षेत्रातील लहान व्यवसायांना सहाय्य करण्यात आले. जेणेकरून या व्यवसायिकांना विस्तार करण्यास व यशस्वी होण्यासाठी मदत मिळेल.
महिलांना पुरुषांच्या बरोबरीने व्यवसाय सुरु करण्यास आणि वाढवण्यासाठी एकत्रितपणे आणि सतत प्रयत्न केले तर 5 ते 6 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स एवढे नवीन जागतिक उत्पादन मिळू शकते, असे ग्लोबल आंत्रप्रेन्योरशिप मॉनिटर (GEM) यांनी विशेषत्वाने सांगितले आहे, अशी माहिती फेडएक्सचे इंडिया ऑपरेशन्स उपाध्यक्ष सुवेंदू चौधरी यांनी दिली. भारतात महिलांच्या मालकीचे 2.2 कोटी उद्योग आहेत. त्यांची क्षमताही मोठी आहे. मात्र भांडवल, व्यावसायिक माहिती आणि बाजारपेठेत प्रवेश यांतील अडचणी अजूनही कायम आहेत. सक्षम उपक्रमाद्वारे युनायटेड वे च्या सहकार्याने फेडएक्स ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच महिला उद्योजकांना भक्कम व्यवसाय स्थापन करण्यास तसेच आर्थिक वृद्धीकरिता हातभार लावत आहे.
युनायटेड वे मुंबई यांच्या सहकार्याने 2021 मध्ये सुरुवातीपासून ‘सक्षम’ने महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. फक्त 2024 मध्ये, ज्या लाभार्थ्यांचे उत्पन्न काहीही नव्हते, त्यापैकी 38% जणांचे सरासरी वार्षिक उत्पन्न ₹61,176 एवढे आहे. तर ज्यांचे उत्पन्न वर्षाला ₹15,000 रुपयांपेक्षा कमी होते, त्यांचे सरासरी उत्पन्न ₹66,782 पर्यंत पोहोचले आहे. उपक्रमामुळे झालेल्या थेट आर्थिक प्रगतीचे संकेत या आकडेवारीवरून मिळतात.
सर्वसमावेशक वाढीसाठीच्या व्यापक वचनबद्धतेचा भाग म्हणून सक्षम LGBTQIA+ कम्युनिटलाही पाठिंबा देते. या उपक्रमात सहभागी होण्यापूर्वी 45 टक्के लाभार्थी बेरोजगार होते. त्यापैकी 68 टक्के जणांना आता खासगी क्षेत्रात दरमाह 14,000–₹15,000 कमावत आहेत. तर 23 टक्के लोकांनी सांस्कृतिक कायक्रम, ब्युटी सर्व्हिस आणि टेलरिंगमध्ये यशस्वी उपक्रम सुरु केले आहेत.
‘युनायटेड वे मुंबई’ मध्ये आम्ही लवचिक समाजाकरिता आर्थइक सक्षमीकरण महत्त्वाचे आहे, यावर विश्वास ठेवतो. सक्षमद्वारे संसाधने, मार्गदर्शन आणि बाजारपेठ यांच्यात जोडणी होताच महिला आणि LGBTQIA+ उद्योजकांवर होणारा परिवर्तनकारी प्रभाव आम्ही प्रत्यक्ष पाहिला आहे. शाश्वत आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या अनेक यशोगाथा या उपक्रमातून समोर येत आहेत. या भागीदारीला समर्थन दिल्याबद्दल आम्ही फेडएक्सचे आभारी आहोत, असे ‘युनायटेड वे मुंबई’ चे सीईओ जॉर्ज ऐकारा म्हणाले.
या उपक्रमाचा लाभ घेणाऱ्या महिला उद्योजकांसाठी सक्षम उपक्रम हा केवळ व्यवसाय वृद्धी नाही तर त्यांच्या परिवर्तनाचा प्रवास आहे. उपक्रमाच्या लाभार्थी आणि ब्युटी सर्व्हिसमधील उद्योजक ममता गवळी म्हणाल्या, ‘सक्षम उपक्रमापूर्वी माझा व्यवसाय टिकवून ठेवणे हा सतत संघर्षाचा भाग होता. व्यवसाय वृद्धी तर अशक्यच होती. मात्र सक्षम किट, ज्यामध्ये आवश्यक संसाधने, उत्पादने आणि उपकरणे मिळाली, त्यामुळे मी माझ्या सेवा वाढवल्या आणि अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित केले. आर्थिक व्यवस्थापनाचे प्रशिक्षण मिळाल्याने मला बचतीचे महत्त्व कळाले. आज माझे बँक खातेही आहे आणि माझा व्यवसाय वाढवण्याकरिता माझ्याकडे स्पष्ट योजना आहे. माझ्या मुलांचे भविष्य चांगले असेल, याची आज मला खात्री आहे.”
एक जबाबदार कॉर्पोरेट नागरिक या भूमिकेतून फेडएक्स आपला प्रवास करत आहे. सक्षमसारखे उपक्रम सर्वसमावेशकतेला तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम भारताला प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेला या उपक्रमाद्वारे बळकटी मिळते. #AccelerateAction अंतर्गत ठोस पावलं उचलत फेडएक्स महिला उद्योजकांच्या भरभराटीसाठी पायाभरणी करत आहे. यामुळे समाजाची उन्नती होते तसेच आर्थिक प्रगतीला चालना मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *