पुणे : सीतामातेवरील बंदिश कमलसी कोमल कमल नयनसी मिथिला किशोरी जनक नंदिनी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई यांच्यावरील माई सांगिनी विनायकी ही बंदिश. राजमाता जिजाबाई यांच्यावरील बंदिश जय जय जिजाऊ…अशा विविध शास्त्रीय बंदिशींच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीमध्ये आजपर्यंत झालेल्या महान स्त्रियांमुळे संस्कृतीला मिळालेल्या भक्ती, शक्ती, शौर्य, मातृत्व, त्याग आदी विविध गुणांचे दर्शन गायिकांनी उलगडून दाखवले
भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘ऊर्जा – सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा’ या कार्यक्रमाचे आयोजन कोथरुडच्या बाल शिक्षण मंदिर येथे करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, सुशील ओक, पं.सुहास व्यास, विदुषी माधुरी डोंगरे, विदुषी मंजिरी कर्वे-आलेगावकर, डॉ. शुभांगी बहुलीकर, अपर्णा केळकर, शेखर कुंभोजकर, पं. विकास पुरंदरे उपस्थित होते.
‘शास्त्रीय बंदिशी द्वारा देवी सीतामाता, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, राजमाता जिजाबाई, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, यमुनाबाई सावरकर अशा महान व्यक्तिमत्वांच्या त्याग, तपस्या, भक्ती, शौर्य, मातृत्व, शक्ती अशा गुणांचा परिचय झाला. भारतमातेवरील विशेष बंदिश या कार्यक्रमात सादर करण्यात आली.
भारतीय संस्कृतीमधील स्त्रियांचे योगदान, त्यांनी दाखवून दिलेला पराक्रम आणि त्यांचा समाजमनावर झालेला परिणाम हे या बंदिशीच्या माध्यमातून रसिकांना अनुभवायला मिळाले. संत मीराबाई यांची श्रीकृष्णावरील भक्ती, राजमाता जिजाऊ यांनी आपल्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज यांना दिलेली शक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांनी केलेला त्याग या गुणांना अनुभवताना रसिकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळले.
संगीतकार आशिष केसकर यांच्या मार्गदर्शनात या संपूर्ण कार्यक्रमाची मांडणी केली गेली. बंदिशींची रचना आणि सादरीकरण संगीतभूषण पं. राम मराठे यांच्या तिसऱ्या पिढीतील गायिका पल्लवी पोटे, मृणाल भिडे, प्राजक्ता मराठे व श्रुती विश्वकर्मा-मराठे यांनी केली. तबल्याची साथ सावनी तळवलकर व हार्मोनियमची साथ सुप्रिया जोशी यांनी केली. कीर्तनकार मानसी बडवे यांनी सूत्रसंचालन केले तर आदिती केसकर यांनी निवेदन केले.
प्रेसनोट प्रसिद्धीसाठी-
बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान
भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा’ : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा सांगीतिक कार्यक्रम