खडकी शिक्षण संस्थेच्या आलेगावकर प्राथमिक माध्यमिक तथा जी. एम. आय कन्या शाळेतील विद्यार्थ्यांकरिता स्वागत समारंभाचे आयोजन आज बुधवार दिनांक 19 जून 2024 रोजी दिमाखदार सोहळ्याने करण्यात आले .
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कलागुणांना वाव देण्याकरिता कार्यरत अशी ओळख खडकी शिक्षण संस्थेची आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सदैव समर्पित असणारे संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी आळंदी येथील आश्रमातील मुला मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था खडकी शिक्षण संस्थेमध्ये करून विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यातील ऐतिहासिक विजयाला आज सुरुवात केली.
लाल कारपेट वरून दिमाखदार मिरवणुकीने …ढोल ताशाच्या गजरात, जागोजागी रांगोळी काढून ….पुष्पवृष्टीकरीत … सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, स्वामी विवेकानंद, डॉ.आंबेडकर, सावित्रीबाई फुले, जिजाऊ ,ज्ञानेश्वर माऊली अशा संत महात्म्यांच्या पेहरावांमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी सभागृहातील वातावरण मंगलमय झाले होते. विद्यार्थ्यांसोबत आलेले पालक एकूणच सर्व वातावरणाने भारावून गेल्याचे दिसून येत होते.
संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य सहसचिव डॉक्टर संजय चाकणे यांनी सुचवलेल्या योजनेनुसार केवळ परिस्थितीमुळे शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी अनाथ विद्यार्थ्यांचा नाथ होण्याची भूमिका संस्थाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी निभावली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या जाण्या येण्यासाठी बसची व्यवस्था, पोषक आहार, गणवेश इत्यादी गोष्टींची सर्वतोपरी तयारी संस्थेने केलेली दिसून आले… आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये संस्थेचे सचिव श्री. आनंद छाजेड यांनी संस्थेच्या पुढील ध्येय धोरणांची माहिती दिली. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी.. पालक…यांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री टिळेकर यांनी केले
याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष श्री अनिल मेहता, सचिव श्री. आनंद छाजेड, सहसचिव सुरजभान अगरवाल, प्राचार्य डॉ. संजय चाकणे , ,संचालक श्री. मधुकर टिळेकर, श्री. रमेश अवस्थे, श्री. ज्ञानेश्वर मुरकुटे, श्री. राजेंद्र भुतडा,श्री. सुधीर फेंगसे आळंदी मठाचे महाराज सचिन जाधव, कार्यकारी अधिकारी श्री. गजानन आहेर ,मुख्याध्यापक श्री.मोहन लोणकर. सौ.ललिता काकडे, सौ चपटे,श्री. घाडगे सर, सौ वैशाली वाघ, सौ. माकर आणि मोठया संख्येने पालक तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मंगेश दळवीआणि अनिता झांबरे यांनी तर आभार प्रदर्शन श्री. मोहन लोणकर यांनी केले