——————————————–
16 जून 2024 रोजी पावागड, गुजरात येथे अति प्राचीन जैन मूर्तींची विटंबना करण्यात आली. तसेच जैन साधू संतांवरील हल्ले व प्राचीन जैन तीर्थान वर अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर होत आहे व शांतिप्रिय जैन समाजाला वेळोवेळी अशा विविध आघातांना सामोरे जावे लागत आहे.
पावागड येथील दोशींवर तत्काल कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी सकल जैन समाज व राष्ट्रीय जैन सेनेच्या वतीने १९ जून २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता पत्रा गल्ली रामोशी गेट येथून कलेक्टर ऑफिस पर्यंत भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला.
पंचमहाल जिल्ह्यात असलेल्या पावागड जैन धर्मासाठी परम श्रद्धेचे प्रतीक आहे आणि या विडंबनात्मक घटनेने जैन समाज दुखावला आहे, संतप्त झाला आहे. या अत्यंत निंदनीय घटनेची पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, पुरातत्व विभाग आणि गुजरात सरकार ने दखल घेत हस्तक्षेप करावा व हे निंदनीय कृत्य करणाऱ्या सर्वांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी जैन समाजाच्या वतीने करण्यात आली.
तसेच जैन साधुसंतांवरील हल्ले व प्राचीन जैन तीर्थांवर असमाजिक तत्त्वांतारे वेळोवेळी होणारे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती अचलभाई जैन, संदीप भंडारी, बाळासाहेब धोका, महेंद्र सुंदेचा यांनी दिली.
मोर्चाचे नेतृत्व क्रांतिकारी जैन आचार्य विराज सागर जी महाराज यांनी केले.
मोर्चात प्रामुख्याने महावीर कटारिया, अभय छाजेड, श्रीमल बेदमुथा, विनोद सोलंकी, निमेश शहा, स्नेहल मेहता, मयूर सरनोत, संदेश बेदमुथा, राजेश सालेचा, सतीश पाटील, प्रकाश बोरा, प्रीतम ओसवाल, अभिजीत शहा, पंकज मेहता, अक्षय परमार, उमेश ओसवाल, आशिष कटारिया, ऋषिकेश शहा, पार्थ वखारिया, प्रकाश बाफना, विपुल बाफना, मितेश जैन, स्मितेश चौहान, प्रीति पाटील, रसिला राठोड, श्रुती मेहता, हेमलता भंडारी, सौरभ धोका, उम्मेदमल धोका, संजय मंडलेचा, यांच्यासह हजारो जैन बांधव व भगिनी सहभागी झाले होते.