युवा उद्योजक डॉ. स्वप्नील कांबळे यांना सिडनी पार्लिमेंट मधे फ्रान्स विद्यापीठाची मानद डॉक्टरेट प्रदान

Spread the love

पुणे : पुण्यातील युवा उद्योजक डॉ. स्वप्नील अशोक कांबळे यांना सिडनी पार्लिमेंट मधे फ्रान्स मधील रॉबर्ट डी सोरबन विद्यापीठ यांच्या वतीने नुकतीच मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. ऑस्ट्रेलिया मधील सिडनी येथे झालेल्या समारंभात विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. थॉमस प्रेड आणि उपाध्यक्ष डॉ. विवेक चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले. ग्लोबल बिजनेस मॅनेजमेंट इन इंटरनॅशनल रिलेशनशिप या विषयाच्या अनुषंगाने डॉ. कांबळे यांना ही डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. इंग्लड स्थित एस राम अँड एम राम या आंतरराष्ट्रीय संबंधांवर काम करणाऱ्या संस्थेचे संचालक असून कंपनीचे युरोपसह विविध देशात कार्य आहे. डॉ. कांबळे हे पुण्यात सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी असतात.महिला,ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, विद्यार्थी यांच्यासाठी त्यांचे बहुमूल्य योगदान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *