अभिनव सोशल फाऊंडेशनतर्फे सामाजिक भान जपत कष्टकरी तृतीय पंथीयांचा विशेष सन्मानपुणे : आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यता दिवसानिमित्त (ट्रान्सजेंडर व्हिजिबिलीटी) अभिनव सोशल फाउंडेशनतर्फे अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. लोकांपुढे हात पसरून पैसे न मागता स्वकष्टाने आयुष्य जगणाऱ्या तृतीय पंथीयांचा धान्याचे कीट व सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.पारलिंगी लोकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ३१ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यता दिन साजरा करण्यात येतो. जगभरातील पारलिंगी लोकांविषयी जनसामान्यांच्या मनात भेदभावाची भावना असते; ही एक शारीरिक स्थिती असल्याचे समाजभान त्यांच्या मनात रुजलेले नसते. परंतु या पारलिंगी व्यक्तींची समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या दिनाचे आयोजन केले जाते.समाजात दुलर्क्षित असलेल्या या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी अभिनव सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय गायकवाड, उद्योजक अभी होमकर, दीपक सोनटक्के, ॲड. मयुरेश चोंधे, अमोल गायकवाड, सचिन बांदल, अमोल डांगे यांनी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कारणाची संकल्पना साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियुष शहा यांची होती, श्री शनि मारुती मंडळाचे सचिन पवार यांची विशेष उपस्थिती होती. एरंडवणे येथील श्री शनि मारुती मंडळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.पुणे महापालिकेत नोकरी करणाऱ्या आराध्या राठोड, जान्हवी काळे, काजल शर्मा, आरुष कुशाळकर, ऋतुजा साळुंके यांचा या वेळी धान्याचे कीट देऊन तसेच मानाचे फेटे बांधून विशेष सन्मान करण्यात आला.या वेळी बोलताना सेजल बल्लोळी म्हणाल्या, आमच्यातीलच काही लोक आम्हाला टोमणे मारतात. आम्ही स्वकष्टाने पोट भरतो म्हणून आम्हाला हिणवतात. परंतु भीक मागून पोट भरण्यापेक्षा कष्टकरून मिळणारा पैसा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. कष्ट करून पोट भरत असल्यामुळेच आमचा येथे सन्मान होत आहे, हे आमच्यासाठी गौरवास्पद आहे.आपण जे आहोत, जसे आहोत त्याचा आनंदाने स्वीकार करत आणि कष्टाने काम करत सन्मानाने जगायचे असते. सन्मानाने काम करणाऱ्यांना सन्मान मिळतो. त्याचप्रमाणे आपल्या पंखाना बळ मिळते, आपल्यात कुठल्याही कमतरता नाहीत याची जाणीव जागृत होते आणि इतरांना आपल्यासारखे सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळू शकते, असे मत पियुष शहा यांनी व्यक्त केले.फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर दीपक सोनटक्के यांनी आभार मानले.फोटो : सत्कारार्थिंसमवेत मंडळाचे पदाधिकारी.

Spread the love

अभिनव सोशल फाऊंडेशनतर्फे सामाजिक भान जपत कष्टकरी तृतीय पंथीयांचा विशेष सन्मान
पुणे : आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यता दिवसानिमित्त (ट्रान्सजेंडर व्हिजिबिलीटी) अभिनव सोशल फाउंडेशनतर्फे अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. लोकांपुढे हात पसरून पैसे न मागता स्वकष्टाने आयुष्य जगणाऱ्या तृतीय पंथीयांचा धान्याचे कीट व सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
पारलिंगी लोकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी ३१ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय पारलिंगी दृश्यता दिन साजरा करण्यात येतो. जगभरातील पारलिंगी लोकांविषयी जनसामान्यांच्या मनात भेदभावाची भावना असते; ही एक शारीरिक स्थिती असल्याचे समाजभान त्यांच्या मनात रुजलेले नसते. परंतु या पारलिंगी व्यक्तींची समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी या दिनाचे आयोजन केले जाते.
समाजात दुलर्क्षित असलेल्या या व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी अभिनव सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय गायकवाड, उद्योजक अभी होमकर, दीपक सोनटक्के, ॲड. मयुरेश चोंधे, अमोल गायकवाड, सचिन बांदल, अमोल डांगे यांनी या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कारणाची संकल्पना साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियुष शहा यांची होती, श्री शनि मारुती मंडळाचे सचिन पवार यांची विशेष उपस्थिती होती. एरंडवणे येथील श्री शनि मारुती मंडळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे महापालिकेत नोकरी करणाऱ्या आराध्या राठोड, जान्हवी काळे, काजल शर्मा, आरुष कुशाळकर, ऋतुजा साळुंके यांचा या वेळी धान्याचे कीट देऊन तसेच मानाचे फेटे बांधून विशेष सन्मान करण्यात आला.
या वेळी बोलताना सेजल बल्लोळी म्हणाल्या, आमच्यातीलच काही लोक आम्हाला टोमणे मारतात. आम्ही स्वकष्टाने पोट भरतो म्हणून आम्हाला हिणवतात. परंतु भीक मागून पोट भरण्यापेक्षा कष्टकरून मिळणारा पैसा आमच्यासाठी खूप मोलाचा आहे. कष्ट करून पोट भरत असल्यामुळेच आमचा येथे सन्मान होत आहे, हे आमच्यासाठी गौरवास्पद आहे.
आपण जे आहोत, जसे आहोत त्याचा आनंदाने स्वीकार करत आणि कष्टाने काम करत सन्मानाने जगायचे असते. सन्मानाने काम करणाऱ्यांना सन्मान मिळतो. त्याचप्रमाणे आपल्या पंखाना बळ मिळते, आपल्यात कुठल्याही कमतरता नाहीत याची जाणीव जागृत होते आणि इतरांना आपल्यासारखे सन्मानाने जगण्याची प्रेरणा मिळू शकते, असे मत पियुष शहा यांनी व्यक्त केले.
फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी प्रास्ताविक केले तर दीपक सोनटक्के यांनी आभार मानले.
फोटो : सत्कारार्थिंसमवेत मंडळाचे पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *