पुणे : शनि दिनांक १३जुलै २०२४रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत नेत्रदीपक पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.पालखी सोहळ्याच्या निमित्ताने इयत्ता पहिली ते चौथीच्या १३०० विद्यार्थ्यांनी वाखरी सारखे भव्य गोल रिंगण केले.यावेळी विद्यार्थी विठ्ठल,रुक्मिणी,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत नामदेव,संत जनाबाई,संत मुक्ताबाई,संत चोखामेळा,संत कान्होपात्रा,संत दामाजी,संत गोरा कुंभार अश्या विविध संतांच्या वेशभूषेत आले होते.तसेच टाळ,मृदुंग,तुळशी वृंदावन,भगव्या पताका इत्यादी हातात धरून नटलेल्या बाल वारकऱ्यांनी रिंगण सजले होते.मुख्य आकर्षण असलेला खराखुरा अश्वराज रिंगणात फिरू लागताच विठोबा रखुमाईच्या गजराने शाळेचा परिसर दुमदुमून गेला. शिक्षिका सौ.मिनल कचरे यांनी स्वतः रचलेले भक्ती गीत “वाट चालली पंढरीची” या गाण्यावर मुलांनी नृत्य केले. आरुष लोहकरे या इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी शंख वादन केले.मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी विदयार्थ्याना प्रत्यक्ष पालखी सोहळा अनुभवता यावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन केल्याचे सांगितले.
शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
साईनाथ मंडळ ट्रस्ट चे अध्यक्ष समाजसेवक पियूष शहा, मंडळाचे विश्वस्त कुमार अन्वेकर तसेच मंडळाचे विश्वस्त नरेंद्र व्यास यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मीनल कचरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तनुजा तिकोने,धनंजय तळपे , प्रतिभा पाखरे, स्वाती यादव यांनी आयोजन सहाय्य केले. योगिता भावकर यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.ज्ञानपंढरीत रंगलेल्या या सोहळ्याला पालक प्रतिनिधींची ही उपस्थिती होती.शाळेतील सर्व शिक्षक पारंपरिक वेशभूषेत या सोहळयात सहभागी झाले होते. शाळेचे शाळा समिती सदस्य ॲड. राजश्री ठकार व अनिल भोसले, वित्त नियंत्रण आनंद काटीकर यांनी आषाढी वारी व पालखी सोहळ्यानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.