पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार यांची आज पुणे येथे भेट घेऊन विविध विषयां संदर्भात निवेदन दिले. यामध्ये पुणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम झाले असून ज्या ज्या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन झाले आहे तेथील रहिवासी गरीब असून हे या योजनेत पक्के घरांचे रहिवासी झाले आहेत. तरी कॉर्पोस पॉइंट व मेंटेनन्स मध्ये येथील खर्च भागत नाही. तसेच मागासवर्गीय लोक अधिक राहत असून येथे पुणे जिल्हा नियोजन समितीच्या वतीने सोलर सिस्टिम, लिफ्ट व कार्यक्रमासाठी सांस्कृतिक समाज मंदिर बांधून देण्यासाठी आर्थिक निधीची तरतूद करावी. सदा-आनंद नगर को-ऑपरेटिव्ह सोसायटी (S.R.A.) सोलर लिफ्ट समाज मंदिर हॉल बांधण्यासाठी 2 कोटी रुपये तरतूद करावी.
2) कमला नेहरू हॉस्पिटल येथील स्वर्गीय पद्मावती कृष्णा उर्फ अम्मा शेट्टी I.C.U. (अतिदक्षता विभाग) पुणे महानगरपालिका येथील विविध कामे करणे 1 कोटी रुपयांची तरतूद जिल्हा नियोजन समिती निधी अंतर्गत करावी.
3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन लगत P.W.D. ची जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात समावेश करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचा विस्तार करणे. P.W.D. च्या जागेत बहुमजली इमारत बांधून P.W.D. साठी लागणारी जागा ठेवून उर्वरित जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे सांस्कृतिक हॉल अभ्यासिका बांधणे ह्या साठी भरीव तरतूद करण्याची मागणी केली असून या सर्व मागण्यांना दादांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशी माहिती सदानंद कृष्णा शेट्टी यांनी दिली.