पुणे : क्रिएटिव्ह फाऊंडेशन यांच्यावतीने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने “उमेद फाउंडेशन” च्या दिव्यांग मुलांना भरघोस मदतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
हा कार्यक्रम दि. २२ जुलै. सकाळी ठीक १० वाजता.ना. चंद्रकांतदादा पाटील ( उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते वनाज कंपनी समोर परमहंस नगर, लेन नंबर १०, आनंद गॅरेज किंवा कृष्णा कॉलनी लेन शामधाम बंगलो, पौड रोड कोथरूड पुणे ३८. येथे होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन सौ. मंजुश्री खर्डेकर (विश्वस्त – क्रिएटीव्ह फौंडेशन) व संदीप खर्डेकर (अध्यक्ष – क्रिएटीव्ह फौंडेशन) यांनी केले आहे .